भाजपकडून खोत, मेटे, दरेकरांना विधानपरिषदेची उमेदवारी
एबीपी माझा वेब टीम | 30 May 2016 01:07 PM (IST)
मुंबई : भाजपने विधानपरिषदेसाठी नावांची घोषणा केली आहे. अखेर भाजपने मित्रपक्षांना संधी दिली आहे. विधानपरिषदेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांना उमेदवारी दिली आहे. खरंतर भाजप विधानपरिषदेच्या तीन जागा लढवणार आहे. त्यासाठी मनोज कोटक, सुरजितसिंह ठाकूर, रघुनाथ कुलकर्णी आणि माधव भंडारी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र भाजपने माधव भंडारींना डावलून प्रवीण दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि दिवाकर रावते हे विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर काँग्रेसने नारायण राणे यांना विधानपरिषदेसाठी संधी दिली आहेत. 11 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक होत आहे.