मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गावरुन वाहतूक करणाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. खारेगावचा टोलनाका मध्यरात्रीपासून बंद होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे पैसे वाचणार आहेतच, त्याचसोबत वाहतूक कोंडीच्या मनस्तापातूनही सुटका होणार आहे.
या टोलनाक्याच्या उभारणी आणि देखभालीचा खर्च वसूल झाल्यानं मध्यरात्रीपासून टोलनाका बंद होणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचे पैसे आता वाचणार आहेत.
खारेगाव टोलनाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतूनही प्रवाशांची मुक्तता होणार आहे.दरम्यान या टोलनाक्याप्रमाणे इतरही टोलनाके बंद करण्याची मागणी केली जाते आहे.