ठाणे : ठाण्यातील खारेगाव टोलनाका राज्यातील बंद होणारा पहिला टोलनाका ठरला आहे. मध्यरात्रीपासून हा टोलनाका बंद झाला. यावेळी वाहनचालकांनी जल्लोषात हा क्षण साजरा केला.

मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्त्याची उभारणी आणि देखभालीचा खर्च वसूल झाल्याने हा टोलनाका बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी आता सुरु झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांची टोलच्या कटकटीतून सुटका होणार आहे. तसंच प्रवाशांचा रांगेमध्ये वाया जाणारा वेळही आता वाचणार आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील या रस्त्याची उभारणी आणि त्याच्या देखभालीचा खर्च वसूल झाल्यानं हा टोलनाका बंद करण्याचा निर्णय आयआरबीनं घेतला आहे. 1998 साली हा टोलनाका उभारण्यात आला होता.

तेव्हापासून रस्त्याची उभारणी आणि देखभालीच्या खर्चाचे 180 कोटी रुपये कंपनीला वसूल करायचे होते. प्रत्यक्षात कंपनीनं यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं वसुली केल्याचं सांगत सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास तावडे यांनी टोलनाका बंद करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश मिळालं आहे.

संबंधित बातम्या:

खारेगाव टोलनाक्याचा झोल उघड, 13 पट नफा कमवूनही वसुली सुरुच