जळगावात खडसे, गिरीश महाजन समर्थक भिडले
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 15 Oct 2016 07:54 PM (IST)
जळगावः मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्याच्या कार्यक्रम पत्रिकेवरून खडसे समर्थकांनी भाजपच्या बैठीकीत गोंधळ घातला. कार्यक्रम पत्रिकेत एकनाथ खडसेंचं नाव खाली छापण्यात आलं. त्यावर खडसे समर्थकांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्री उद्यापासून जळगावच्या दौऱ्यावर आहेत. त्यासाठी जळगावच्या ब्राह्मण संघ सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीला खुद्द एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. दरम्यान प्रोटोकॉलनुसार खडसेंचं नाव योग्य ठिकाणी छापल्याची माहिती गिरीश महाजनांनी दिली. तर समर्थकांना प्रोटोकॉल माहीत नव्हता, त्यामुळं त्यांनी गोंधळ घातला, असं स्पष्टीकरण खडसेंनी दिलं.