नागपूर : भाजप नेते आणि महाराष्ट्र राज्याच्या इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव यांची सीआयडीमार्फत चौकशी सुरु झाली आहे. सीआयडीने आज तीन तास ओमप्रकाश यादव यांची बाजू जाणून घेतली.
ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव वर धमकी देऊन खंडणी मागितल्याचे आरोप आहे. ओमप्रकाश यांच्याविरोधात धमकी देऊन खंडणी मागितल्याचं प्रकरण सोनेगाव पोलिस स्थानकात दाखल झाले असताना, तेव्हा राजकीय हस्तक्षेपामुळे नागपूर पोलिसांनी योग्यरित्या तपास न केल्याचे आरोप केले जात होते.
त्यानंतर नागपूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत, काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने तपास नागपूर पोलिसांकडून काढून घेत सीआयडीकडे सोपवला. त्यानंतर आजपासून सीआयडीने तपास सुरु केले असून आज तीन तास चौकशी केली.