Kedar Dighe on Eknath Shinde : धर्मवीर-2 टीझरमध्ये जर तु आणि तुझ्या हिंदुत्वामध्ये आलो, तर मला बाजूला कर, हा डायलाॅग फेक वाटत असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी केली आहे. धर्मवीरमधील डायलॉगवर केदार दिघे यांनी आक्षेप घेतला आहे. एकनाथ तू जर माझ्यामध्ये आणि हिंदूंत्वामध्ये आडवा आला तर मी तुला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मारेन, खरं म्हणजे असा डायलॉग पाहिजे असा खोचक टोलाही केदार दिघे यांनी (Kedar Dighe on Eknath Shinde) लगावला. हा चित्रपट काढणाऱ्यांची दिघे साहेबांवर शंका आहे का? त्यांच्यावर विश्वास नाही का अशी विचारणा केदार दिघे यांनी केली. आपण केलेली वाईट कृत्ये लपवण्यासाठी चित्रपट काढून प्रतिमा सुधारण्याचा हा प्रयत्न आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील यांना दिलेल्या पाठिंब्यावरूनही दिघे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. ते म्हणाले की जर असं दिघे साहेबांनी शिंदेंना 2000 मध्ये सांगितले असेल, तर बाळासाहेबांनी 2009 ला काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला होता, त्यावेळी एकनाथ शिंदे कुठे होते अशी विचारणा त्यांनी केली. मुळात पक्षाची भूमिका पक्षश्रेष्ठी घेत असतो आणि जी बाळासाहेबांनी घेतली. दिघे साहेब हिंदुत्वाच्या आड येऊ शकतात, असं चित्रपट निर्माते आणि शिंदे यांना म्हणायचं आहे का? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली.
शिंदेंच्या डोक्यात हवा गेली
मुळात आपल्या पक्षाच्या भूमिका घेण्याचा सर्वाधिकार हा शिवसेना पक्ष नेतृत्वाला असतो हेच मान्य करायला शिंदे तयार नाहीत. पक्ष नेतृत्वाने घेतलेले निर्णय हे अंतिम असतात, ते पक्षाच्या हिताचे असतात हे शिंदेंना मान्य नाही. स्वतःला पक्षापेक्षा, बाळासाहेब ठाकरे, दिघे साहेब, मातोश्री, उद्धव साहेब ठाकरे यांच्या पेक्षा मोठे समजायला लागल्यानेच शिंदेंच्या डोक्यात अशा पद्धतीची हवा गेली आहे.
नागरिक नक्कीच दाखवून देतील
अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला सुद्धा केदार दिघे यांनी प्रत्युत्तर दिले. औरंगजेब फॅन्स क्लब वगैरे आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे नागरिक नक्कीच दाखवून देतील की हे नागरिक कोणाचे फॅन क्लब फॉलो करतात आणि कोणाचा नाही.
इतर महत्वाच्या बातम्या