Karuna Sharma News Kolhapur Updates : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Kolhapur North by poll election) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यांच्या नावाबाबत तांत्रिक मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. दरम्यान अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की, माझ्याकडे सर्व कायदेशीर पुरावे आहेत. धनंजय मुंडे यांनी सहा-सहा मुले आणि अनेक पत्नी लपवल्याचा आरोपही त्यांनी केला. यापूर्वी आमच्या दोघांवर सिनेमा काढल्यावर तो हिट होईल असे वक्तव्य त्यांनी केले होते.  


आज कोल्हापुरात बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या की, आमच्या प्रेमकहाणीवरचे पुस्तक अंतिम टप्प्यात असून त्यातून अनेक पुरावे समोर आणणार आहे. या पुस्तकात 25 वर्षाची आमची कहाणी असणार आहे. यामध्ये पुराव्यांसह लग्नाचे फोटो देखील असतील. हिंदी भाषेत हे पुस्तक लिहून झालं आहे. हिंदी आणि मराठी भाषेत हे पुस्तक असेल.


नावावरुन ऋटी निर्माण होण्याच्या शक्यतेवर बोलताना त्यांनी म्हटलं की,  माझ्याकडे जे पेपर आहेत त्याच्या आधारावरच मी फॉर्म देखील भरला आहे. माझ्या कागदपत्रांमध्ये काहीही ऋटी नाहीत. टेक्निकल प्रॉब्लेम तर माझ्या पतीच्या कागदपत्रांमध्ये आहेत. त्यांनी सहा-सहा मुलं लपवली आहेत. अनेक पत्नी लपवल्या आहेत, तो टेक्निकल प्रॉब्लेम आहेत. माझ्या फॉर्ममध्ये काहीही प्रॉब्लेम नाही, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. जगाला हे पुरावे दिसतीलच, असं त्यांनी म्हटलं.


करुणा शर्मा म्हणाल्या की, मला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा आशिर्वाद आहे. कोल्हापूरची जनता मला विधानसभेत पाठवेल असं त्या म्हणाल्या. घराणेशाहीचं राजकारण संपवून कोल्हापूरचा विकास करणं हाच माझा उद्देश आहे, असं त्या म्हणाल्या. 


'करुणा मुंडेंवर चित्रपट काढण्यासाठी अनेक दिग्दर्शक रांगेत उभे...'
आमच्यावर चित्रपट निघाला तर सर्वांना कळेल की महाराष्ट्रातील राजकारण काय आहे? आणि इथले नेते कसे आहेत? करुणा मुंडेंवर चित्रपट काढण्यासाठी अनेक दिग्दर्शक रांगेत उभे आहेत, असं करुणा शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. कश्मीर फाईल्स सिनेमावर मोठे-मोठे नेते बोलत आहेत, ही मुर्खता आहे. देशामध्ये शेतकरी आत्महत्या, महागाई, महिला सुरक्षा असे अनेक प्रश्न आहेत. परंतु, या प्रश्नांवर कोण बोलत नाही. करुणा धनंजय मुंडे यांना पती धनंजय मुंडे यांनी जेलमध्ये टाकले, त्यावर कोण बोलत नाही. काश्मीर फाईल्स फक्त चित्रपट आहे आणि तो चित्रपटच राहणार आहे. नेत्यांना बोलायचं असेल तर दिशा सालीयन, पूजा चव्हाण आणि करुणा मुंडेंवर बोला, असं करूणा शर्मा यांनी म्हटलं होतं. 



महत्वाच्या बातम्या