Karuna Sharma:राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात आज  माजगाव सत्र न्यायालयात सुनावणी होती. यात करुणा शर्मा यांच्याशी झालेले लग्न अधिकृत नसल्याचा युक्तीवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात केल्यानंतर करुणा शर्मा यांनी यावर  'मीच धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे. वसीहतनामामध्येही माझा पत्नी म्हणून उल्लेख असल्याचं करुणा शर्मा म्हणाल्या आहेत. सगळ्याचे पुरावे कागदपत्र माझ्याकडे आहेत. मी पंधरा लाख रुपये महिना पोटगी घेणार' असल्याचं त्या म्हणाल्यात. (Karuna Sharma)

दरम्यान, करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्याशी लग्न झाल्याचे पुरावे आहेत का? असा सवाल न्यायाधीशांकडून करण्यात आला. यावर सगळे पुरावे सादर करण्यासाठी आम्हाला वेळ हवा असल्याचं करुणा शर्मांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयाने 5 एप्रीलला पुढील सुनावणीची तारीख दिली असून पुढील सुनावणीपर्यंत पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

काय म्हणाल्या करुणा शर्मा?

  • मीच धनंजय मुंडे यांची पहिली बायको, सगळ्याचे पुरावे कागदपत्र माझ्याकडे आहेत, पंधरा लाख रुपये महिना पोटगी घेणार -करुणा मुंडे
  •  2016 मध्ये जेव्हा धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात  बदनामी केल्याप्रकरणी केस दाखल केली होती  त्यावेळी त्यांच्या याचिकेमध्ये त्यांनी स्वतः लिहून दिलेला आहे 1998 मध्ये करुणा मुंडे यांच्यासोबत माझं लग्न झालं आहे . 2002 साली राजश्री यांच्यासोबत धनंजय मुंडे यांचे लग्न झालं आहे .
  • आता ते म्हणतात की माझं करुणा मुंडे यांच्यासोबत लग्न झालं नाही त्या माझ्या लिव इन पार्टनर आहेत. 1998 मध्ये लिव्ह इन सारखा नाव नातं देशात होतं तरी का?
  • बँकेत आमचे जॉईंट अकाउंट आहेत, एका पॉलिसीमध्ये सुद्धा पत्नी म्हणून माझं नाव आहे...
  • वसीहतनामामध्ये सुद्धा माझं पत्नी म्हणून उल्लेख आहे.. त्यांनी त्यावर सही केलेली आहे.
  • कोर्टात पुरावे लागतात.. न्यायाधीश पुरावे बघून निर्णय घेतील... 5 एप्रिलला आम्ही पुरावे सादर करू आणि खालच्या कोर्टाने जो निर्णय दिला होता तो न्याय इथे सुद्धा मिळेल.
  • आमची जी लाईफ स्टाईल सध्या आम्ही जगतो आणि मागील 27 वर्षापासून जगतो त्या लाईफस्टाईल मध्ये दहा ते पंधरा लाख रुपये आम्ही खर्च करतो...
  • तीन कंपन्यांमध्ये माझे जर पैसे गुंतवलेले असतील तर धनंजय मुंडे यांनी पुरावे द्यावे .ज्या कंपन्यांचा उल्लेख त्यांनी केला त्या कंपन्यांमध्ये एक रुपया नाही
  • मला महिन्याला पंधरा लाख रुपये पोटगी हवी आहे... मी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढेल. पण मला पंधरा लाख रुपये महिना पोटगी हवी
  • चाळीस ते पन्नास कोटीची माझी प्रॉपर्टी होती... धनंजय मुंडे यांचा ज्यावेळी 2009 मध्ये वाईट काळ होता तेव्हा माझी सगळी प्रॉपर्टी विकून टाकली
  • 27 वर्ष मी दिलेले आहेत. मी कुठे जाऊ? नौकरी करू शकत नाही त्यामुळे त्यांना मला पैसे द्यावे लागतील...असे दावे करुणा शर्मा यांनी केले आहेत.

 

हेही वाचा:

Dhananjay Munde-Karuna Sharma: धनंजय मुंडेंनी करुणासोबत अधिकृत लग्न केलंच नाही, वकिलाचा युक्तिवाद; न्यायाधीश म्हणाले, मग मुलं कोणाची?