कर्नाटक :  हिजाबवरच्या वाढत्या वादामुळं कर्नाटकातल्या शाळा आणि महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवणयात येणार आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. राजकीय पक्षांच्या हातातलं खेळणं बनू नका असं सांगत विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचं आवाहनही त्यांनी केले आहे. 


 हिजाबवरुन कर्नाटकातल्या काही कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळं मुलींनी आंदोलन सुरु केलं होतं. त्याला उत्तर देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानंतर दोन्ही बाजूच्या विद्यार्थ्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. काही शाळांसमोर दगडफेकही झाली होती. यानंतर आता कर्नाटक सरकारनं शाळा, कॉलेजेस तीन  दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 


कर्नाटक कॉंग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी ट्वीट केले आहे की, कर्नाटकातील काही शैक्षणिक संस्थातील परिस्थिती इतकी खराब आहे की, एका ठिकाणी तिरंग्याला बटवत त्या जागी भगवा झेंडा फडकवण्यात आला आहे. शैक्षणिक संस्थामधील परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान एक आठवडा तरी शैक्षणिक संस्था बंद केल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी वर्ग ऑनलाईन सुरू ठेवावे.


 





दरम्यान कर्नाटक हायकोर्टाने हिजाबवरुन  मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याच्या व्यवस्थापनाच्या निर्णयाविरुद्ध याचिकेचा स्वीकार करत त्यानर सुनावाई सुरू केली आहे. ही याचिका उड्डपीतील सरकारी प्री यूनीव्हर्सिटी महाविद्यालयात शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनींनी केली आहे. ज्यांना हिजाब  घातल्यामुळे  महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला आहे.


हायकोर्टाने सुनावणी दरम्यान मंगळवारी सांगितले की, विद्यार्थ्यांनी या प्रकरणी रस्त्यावर उतरणे, एका विद्यार्थ्याच्या गटाने दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या गटावर हल्ला करणे, हिंसेत सहभागी असणे ही चांगली गोष्ट नाही. या प्रकरणी बुधवारी दुपारी 2.30 वाजता पुढील सुनावणी होणार असल्याचे हायकोर्टाने म्हटले आङे,


बोम्मई यांनी शाळा आणि  महाविद्यालये 12 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात महाविद्यालये आणि शाळांबाहेर हिजाब समर्थक आणि हिजाब विरोधक  गटांकडून निदर्शने करण्यात येत आहे. हिजाब समर्थक ग्रुप हिजाब घातल्याने मुस्लिम विद्यार्थिनींना वर्गात प्रवेश नाकारल्याबद्दल आणि त्यांच्यावर लावण्यात आलेल्या बंधनांचा विरोध करत आहे. तर दुसरीकडे अनेक हिंदुत्ववादी संघटानांनी हिजाबचा विरोध करत हिंदू विद्यार्थ्यांना देखील भगव्या रंगाची शाल आणि टोपी वाटत आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Karnataka Hijab Row: कर्नाटकातील हिजाब वादावर ओवेसी म्हणतात, "आज झुकलो तर..."