Gautam Adani is Asia's Richest Person: अदानी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानींनी रिलायन्सच्या मुकेश अंबानींना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला आहे.ब्लुमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सने (Bloomberg Billionaires Index) जाहीर केलेल्या यादीनुसार, गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत तर जगातील दहावे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. 


ब्लुमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्स (Bloomberg Billionaires Index) ने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अदानी उद्योग समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांची संपत्ती 88.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे. तर रिलायन्सच्या मुकेश अंबानींची संपत्ती ही 87.9 अब्ज डॉलर्स इतकी असून ते आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे तर जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. 


दोन दिवसांपूर्वी फोर्ब्जने रिअल टाईम बिलेनियर इंडेक्स (Forbes Real Time Billionaire Index) जारी केला असून त्यामध्ये गौतम अदानी यांची संपत्ती ही 90.1 अब्ज डॉलर इतकी असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर रिलायन्सच्या मुकेश अंबानींची संपत्ती ही 89.4 अब्ज डॉलर इतकी असल्याचं नमूद केलं आहे. संपत्तीच्या बाबतीत गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी यांनाच नव्हे तर मेटाच्या मार्क झुकरबर्गलाही (Mark Zuckerberg) मागे टाकलं आहे.


सौदी अरबच्या अरामको सोबतची डील रद्द झाल्याचा रिलायन्सला फटका
सौदी अरबच्या अरामको या कंपनीसोबत रिलायन्सची एक मोठी डील होणार होती. पण ही डील गेल्या वर्षी रद्द झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घट झाली होती. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रिच्या महसुलात मोठी घट झाली होती.


महत्त्वाच्या बातम्या: