पंढरपूर : तुळशी विवाहानंतर सगळीकडे लग्नसराई सुरु झाली असताना काही शेतकरी कुटुंबातील खास विवाहसोहळे लक्षवेधी ठरु लागले आहेत. काही दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याने हौसेखातर आपल्या मुलीची सासरी पाठवणी थेट हेलिकॉप्टरमधुन केली होती. आता करमाळ्यातील शेतकऱ्यानेही आपल्या लाडक्या लेकीच्या पाठवणीसाठी हेलिकॉप्टर आणुन स्वप्नपुर्ती केली.


हौसेला मोल नसतं' असं म्हणतात. याचीच प्रचिती करमाळ्यातील ग्रामस्थांना आली. करमाळ्यातील कंदरमधील शिवाजी पाटील यांची कन्या स्नेहल हिचा विवाह इंदापूर तालुक्यातील बेलवाडीमधील कांतीलाल जामदार यांचे पुत्र अक्षय याच्याशी झाला. कंदरमधील शिवाजी पाटील हे शेतकरी वडिलोपार्जित शेतीचच काम करतात. मुलीचं लग्न ठरल्यानंतर स्वतःच्या मुलीचा विवाह आठवणीत रहावा असा करण्याची त्यांची इच्छा होती.

आपल्या मुलीला लग्नस्थळी पाठवण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर बोलवले. मुलगी असली तरी तिची हौस करण्यात कुठेही कमी पडायचं नाही अशीच पाटील कुटुंबाची इच्छा होती. यासाठी सर्वसामान्यपणे कागदावर लग्नपत्रिका बनविण्याची प्रथा असताना पाटील यांनी रुमालावर लग्न पत्रिका तयार करुन वाटल्या होत्या. नुकतेच राज्यात सत्ताबदल झाला आहे. शरद पवार हे शेतकऱ्यांचे दु:ख जाणणारे नेते असल्याने आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. आता शेतकरी ताठ मानेने उभा राहील, आम्हाला चांगले दिवस येतील. आमच्याही हौसेला मोल नाही. त्यामुळे मी मुलीला हेलिकॉप्टरने पाठवणी केली याचा आनंद आहे.

उपरी येथेही हेलिकोप्टरने केली होती पाठवणी -
उपरी येथील सराफी व्यावसायिक दत्तात्रय मोहिते यांनी मुलीच्या लग्नासाठी तिची पाठवणी थेट हेलिकॉप्टरमधून केली. इवल्याशा गावात भलं-मोठं हेलिकॉप्टर उतरल्यामुळे, गावकऱ्यांनी हेलिकॉप्टरभोवती गराडा घातला. वडील दत्तात्रय मोहिते यांनी पुणे येथून भाड्याने हेलिकॉप्टर आणलं. गावात हेलिकॉप्टरचा आवाज घुमताच गावकऱ्यांनी ते पाहण्यासाठी एकच गर्दी केली. मुलीची हेलिकॉप्टरमधून लग्नासाठी पाठवण्याची घटना फारच क्वचित पाहायला मिळते. त्यात उपरीसारख्या ग्रामीण भागात तर या निमित्ताने इतिहासच घडला आहे. त्यामुळे उपरीवासियांना 'हौसेला मोल नसते' याचीच प्रचिती आली.

संबंधित बातम्या :

बापाच्या हौसेला मोल नाही, लग्नात मुलीची हेलिकॉप्टरमधून पाठवणी

State News | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट | ABP Majha