नागपूर: दिल्लीतील जवाहरलाला नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूतील छात्र संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमारचं आज नागपूरमध्ये भाषणादरम्यान अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. भषण सुरु असतानाच कन्हैयाच्या दिशेने एका व्यक्तीन चप्पल भिरकावली. चप्पल फेकणारा व्यक्ती अभाविपचा कार्यकर्ता असल्याचं समजतं आहे.

 

सुरुवातीपासूनच कन्हैयाच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला गेला. सुरुवातीला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना हॉलमधून बाहेर काढलं. त्यानंतर पुन्हा एकदा एका कार्यकर्त्यानं घोषणाबाजी केली. त्यालाही बाहेर काढण्यात आलं.

 
त्यानंतर कन्हैयानं भाषणाला सुरुवात केली. त्यानं किमान 5 मिनिटं भाषण केलं. या पाच मिनिटांमध्ये कन्हैयानं भाजप आणि संघावर जोरदार टीका केली. कन्हैयानं संघावर टोमणा मारल्यानंतर हॉलमध्ये उपस्थित असणाऱ्या एका अभाविपच्या कार्यकर्त्यानं कन्हैयाच्या दिशेने चप्पल भिरकावली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. या सगळ्या प्रकारामुळे सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला होता.