कोल्हापूर : शनी शिंगणापूर मंदिरातील चौथरा प्रवेशानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईचं मंदिर महिलांना दर्शनासाठी खुलं झालं. मात्र यावेळी दर्शन घेण्यासाठी पोहोचलेल्या भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाईंना पोलिसांच्या समोरच मारहाण झाली. तृप्ती देसाई यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हायकोर्टाच्या आदेशानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईचा गाभारा महिलांसाठी खुला करण्यात आला. यानंतर तृप्ती देसाई दर्शनासाठी आल्याचं समजल्यानंतर स्थानिकांनी विरोध केला. मोठ्या संख्येने इथे नागरिक जमा झाले होते. देसाईंनी संध्याकाळी 7.30 वाजता अंबाबाईची पूजा केली. गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर तृप्ती देसाई आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली.
साडीऐवजी पंजाबी ड्रेस घातल्याने मारहाण?
तृप्ती देसाईंनी साडीऐवजी पंजाबी ड्रेस परिधान करुन मंदिरात गेल्या होत्या. या गोष्टीवर स्थानिक नाराज होते. त्यामुळेच देसाईंना मारहाण केल्याचं म्हटलं जात आहे. काही पुजारींनीही त्यांना मारहाण केल्याचं आरोप होत आहे. इतकंच नाही तर काही लोकांनी तृप्ती देसाईंवर मिरची पावडर टाकल्याचं कळतं.
कोल्हापूर प्रशासनाने हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांच्या साथीने मला मारण्याचा कट रचल्याचा आरोप तृप्ती देसाईंनी केला आहे.
Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
अंबाबाई मंदिरात तृप्ती देसाईंना मारहाण, रुग्णालयात दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Apr 2016 05:00 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -