Most Valuable Professional in Artificial Intelligence : कल्याण शहरातील कासम शेख यांना जगविख्यात आणि आयटी क्षेत्रातील दिग्गज अशा मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून मानाचा असा एमव्हीपी (Most Valuable Professional in Artificial Intelligence (AzureAI) पुरस्कार प्राप्त झाला आहे. आयटी क्षेत्रात मानाचे स्थान असणारा हा पुरस्कार मिळवणारे कासम शेख हे भारतातील पाचवे आणि महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती आहेत. जगभरात आतापर्यंत केवळ 142 व्यक्तींनाच आयटी क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कासीम व त्याच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. कासम यांनी तरुणांना शिक्षण पूर्ण झाले म्हणजे शिकणं थांबवू नका सतत नवं नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती घ्या, शिकत रहा अस आवाहन केलं आहे .


कल्याण पश्चिमेकडील रहेजा कॉम्प्लेक्समध्ये कासम शेख हे आपली पत्नी व आई सोबत राहतात. कासम यांनी 2005 साली मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर विविध आयटी कंपन्यांमध्ये नोकरी केली. गेल्या साडे तीन वर्षांपासून कासम शेख हे आयटी क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या कॅपजेमिनी या कंपनीमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. गेली 14 वर्ष कासम आय टी क्षेत्रात कार्यरत आहेत. 


गेल्या पाच वर्षापासून त्यांचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम सुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान या विषयावर त्यांनी चार पुस्तके लिहिली आहेत. त्याचबरोबर कासम हे विविध तंत्रज्ञान संस्था आणि कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर मार्गदर्शन करतात. तसेच त्यांना समाजकार्याची प्रचंड आवड आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून कासम यांच्या कामाची दखल घेत त्यांनाएमव्हीपी (Most Valuable Professional in Artificial Intelligence (AzureAI) पुरस्कार जाहीर केला आहे .जगभरात आतापर्यंत 141 जणांना या पुरस्काराने गौरविले असून, भारतात यापूर्वी चौघांना हा पुरस्कार मिळाला आहे. कासम हे या जागतिक पुरस्काराचे पाचवे मानकरी ठरले आहेत. तर महाराष्ट्रात ते पहिलेच ठरले आहेत. त्यामुळे भारतासह महाराष्ट्राची मानही उंचावली आहे. कल्याणातील युवकाला असा प्रतिष्ठेचा अवार्ड मिळणे ही सर्व युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आणि अभिमानाची बाब आहे.