Nana Patole : राज्यातील 15 महानरपालिकांच्या निवडणुका येत्या काही दिवसांमध्ये होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. परंतु, यात सत्तेत असेले पक्षही एकमेकांवर टीका करत आहेत. "पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसचं बळ किती आहे. हे कोणत्या नेत्यांनी ठरवू नये, ते जनताच ठरवेल. तसेच इतर पक्षांनी त्यांची भूमिका आधीच सांगितल्याने आघाडीचा प्रश्न मिटल्याचं अप्रत्यक्षपणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. याबरोबरच पुणे आणि पिंपरीत काँग्रेस कोणामागे जात स्वतःची फरफट होऊ देणार नाही, असे मत नाना पटोले यांनी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला उत्तले दिले.  


"स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसचं इथं किती बळ आहे? याचा पंचनामा आपण करायला नको. त्यापेक्षा आपल्याशी आघाडी करण्याची मानसिकता ठेवणाऱ्या शिवसेनेसोबत निवडणुका लढायचा विचार करूया. असं डिसेंबर महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी म्हटलं होतं. आज पिंपरी-चिंचवडमध्ये नाना पटोले यांनी अजित पवार यांच्या या टीकेला उत्तर दिले. 


पिंपरी-चिंचवडमध्ये आज काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी नाना पटोले  आले होते. यावेळी ते बोलत होते. 


नाना पटोले म्हणाले, पिंपरी-चिंचवडमध्ये कॉंग्रेस कोणामागे फरफटत जाणार नाही. एखाद्या पक्षाकडून आघाडीबाबत प्रस्ताव आला तर चर्चा झाली करू. परंतु, इतर पक्षांनी त्यांची भूमिका आधीच स्पष्ट केल्याने तो प्रश्न मिटल्याचं अप्रत्यक्षपणे पटोलेंनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत काँग्रेस आघाडी करणार नाही, हे जवळपास स्पष्ट झालंय. पिंपरी आणि पुण्यात काँग्रेसला नवी पालवी देण्याचे काम सुरू असल्याचंही नाना पटोले यावेळी म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या