कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. नगरसेविका माधुरी काळे यांच्या पतीवरील हल्ल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.


शिवसेना नगरसेविका माधुरी काळे यांचे पती प्रशांत काळे यांच्यावर 8 मार्च रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे महेश गायकवाड यांचा हात असल्याचा आरोप प्रशांत काळे यांनी केला होता.

शिवसेना नगरसेविका आणि पतीचा सेना पदाधिकाऱ्यांवर आरोप

यानंतर पोलिसांनी जवळपास महिनाभर तपास करत 3 जणांना अटक केली होती. या तिघांनी महेश गायकवाड यांचं नाव घेतल्यानंतर पसार झालेल्या गायकवाड यांचा शोध सुरु होता. अखेर महेश गायकवाड यांना अहमदनगरमधून अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर बोलण्यास पोलिसांनी नकार दिला.