मुंबई: जलसंपदा विभागात लवकरच मेगाभरती होत आहे. अभियंत्यांसाठी ही भरती असेल. यावेळी एक-दोन नव्हे तर कनिष्ठ अभियंत्यांची तब्बल 1300 पदं भरण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे एक ऑक्टोबरपर्यंत पदं भरुन, रुजू करुन घेण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती जलसंपदा खात्याचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांनी बुधवारी दिली.
राज्यभरातील जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंत्यांची 1300 जागा रिक्त आहेत. या जागांच्या भरतीबाबत न्यायालयात सुनावणी सुरु आहे. याबाबतचा निकाल येत्या दोन-चार दिवसात येण्याचा अंदाज आहे. त्यानंतर तातडीने याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, असं चहल यांनी सांगितलं.