मुंबई : देशासह राज्यातील महत्वाच्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संबंधीचे अपडेट आम्ही आपल्याला JOB Majha च्या माध्यमातून देणार आहोत. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ आणि भारतीय नौदलात विविध पदांसाठी भरती होत आहे. बी.ई. बी.टेक झालेल्यांपासून ते अगदी 10वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी नोकरीची संधी आहे. अर्ज कुठे करायचा, कसा करायचा? त्यासाठी पात्रता काय आहे? याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. ही संधी सोडू नका. याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.


आयकर विभाग आणि महाराष्ट्र दूरसंचार विभागात नोकरीच्या संधी आहेत. दहावी उत्तीर्ण, पदवीधर असलेल्यासाठी ही संधी आहे. आयकर विभागात विविध पदांच्या 155 जागांसाठी भरती होतेय. तर  महाराष्ट्र दूरसंचार विभागात मुंबई आणि गोव्यात नोकरीच्या संधी आहेत. कसं अप्लाय कराल, अर्ज करण्याची शेवटची तारीख याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या. 



  • आयकर विभाग विविध पदांच्या जागांसाठी भरती


एकूण जागा -155


पहिली पोस्ट - कर सहाय्यक


एकूण जागा – 83


शैक्षणिक पात्रता- पदवीधर



  • दुसरी पोस्ट - मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)


एकूण जागा – 64


शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण



  • तिसरी पोस्ट – आयकर निरीक्षक


एकूण जागा – 08


शैक्षणिक पात्रता – पदवीधर


नोकरीचं ठिकाण आहे – मुंबई


ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.


अधिकृत वेबसाईट - www.incometaxindia.gov.in


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2021



  •  महाराष्ट्र दूरसंचार विभाग विविध पदांच्या जागांसाठी भरती


पोस्ट - वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, लोअर डिव्हिजन लिपिक आणि एमटीएस.


एकूण जागा – 33


नोकरीचं ठिकाण – गोवाा, मुंबई


अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी आहे- cca.mhgoa@gmail.com


अधिकृत वेबसाईट - dot.gov.in


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2021


जॉब माझा : भारतीय नौदल, विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांची भरती, कसा कराल अर्ज?