Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.  बँक ऑफ बडोदा  येथे एकूण 220 जागांसाठी भरती होत आहे. विविध पोस्टविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.


बँक ऑफ बडोदा


पहिली पोस्ट – झोनल सेल्स मॅनेजर



  • एकूण जागा – 11

  • शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि 12 वर्षांचा अनुभव

  • वयोमर्यादा – 32 ते 48 वर्ष


 
दुसरी पोस्ट – रिजनल सेल्स मॅनेजर



  • एकूण जागा – 09

  • शैणक्षिक पात्रता – पदवीधर आणि आठ वर्षांचा अनुभव

  • वयोमर्यादा – 28 ते 45 वर्ष


 तिसरी पोस्ट – असिस्टंट वाईस प्रेसिडेंट



  • एकूण जागा – 50

  • शैक्षणिक पात्रता - पदवीधर आणि आठ वर्षांचा अनुभव

  • वयोमर्यादा – 28 ते 45 वर्ष


 चौथी पोस्ट – सिनियर मॅनेजर



  • एकूण जागा- 110

  • शैणक्षिक पात्रता – पदवीधर आणि पाच वर्षांचा अनुभव

  • वयोमर्यादा – 25 ते 37 वर्ष


 पाचवी पोस्ट – मॅनेजर



  • एकूण जागा – 40

  • शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि दोन वर्षांचा अनुभव

  • वयोमर्यादा – 22 ते 35 वर्ष

  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2022


अधिकृत वेबसाईट - www.bankofbaroda.in   (या वेबसाईटवर गेल्यावर about us मध्ये careers वर क्लिक करा. त्यात current opportunities वर क्लिक करा. त्यात तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


  नैनिताल बँक लि.


100  रिक्त जागांसाठी भरती होत आहे.


पोस्ट – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, लिपिक



  • एकूण जागा – 100 (यात व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी 50 आणि लिपिक पदासाठी 50 जागा आहेत.)

  • शैक्षणिक पात्रता – पदवी किंवा पदव्युत्तर पदवी

  • वयोमर्यादा – 21 ते 30 वर्ष

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022


अधिकृत वेबसाईट - www.nainitalbank.co.in   (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. Notification वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha