ठाणे : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यात उफाळून आलेलं वाग्युद्ध संपण्याची चिन्हं नाहीत. किंबहुना एकमेकांवरच्या आरोप-प्रत्यारोपानं ते अधिकच चिघळत चाललं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर बाप बदलणारा नेता असा आरोप केला होता. त्यानंतर गणेश नाईक यांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं. त्यावर गणेश नाईक 'दादां'च्या विधानावरुन एक लक्षात आले, की गणेश नाईक कृतघ्न आहेत. ज्या शरद पवार यांनी त्यांच्यावर उपकार केले. त्यांचेच नाव घेऊन त्यांनी आपल्या कृतघ्नतेवर शिक्कामोर्तब केलं, असा जोरदार टोला गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

विकासकामांसाठी आणि स्वाभिमानासाठी आपण पक्ष बदलले आहेत. पण आपल्या आधी शरद पवार यांनीही अनेकवेळा पक्षबदल केला आहे. त्यामुळं पक्ष बदलणाऱ्या शरद पवार यांच्याविषयी जितेंद्र आव्हाड काय भूमिका घेणार, असा प्रश्न गणेश नाईक यांनी विचारला होता. त्यावर आव्हाड यांनी नाईक कृतघ्न असल्याची टीका केलीय. कोपरखैरणेतल्या सभेत गणेश नाईक हे नवी मुंबईतील खंडणीखोर नेते असल्याचा आरोप करून, आव्हाड यांनी नाईकांचं साम्राज्य नामशेष करण्याचं लोकांना आवाहन केलं होतं. त्यावर उत्तर देताना गणेश नाईकांनी 'ये तेरा काम नही है, तेरे बाप को भेज' असं म्हणून आव्हाडांवर प्रतिहल्ला चढवला. त्यानंतर त्या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा खेळ रंगला आहे.

... तर पवार साहेबांचाही बाप काढणार का? गणेश नाईकांचं आव्हाडांना प्रत्युत्तर

शरद पवार यांनी बाप नाही बदलला ते बाप झाले
पक्षांतर करणार्‍या शरद पवारांची गणनाही बाप बदलणार्‍या औलादींमध्ये करणार का?, असा सवाल करत गणेश नाईक यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेला डॉ. आव्हाड यांनी अत्यंत समर्पक भाषेत उत्तर दिले आहे. डॉ. आव्हाड यांनी म्हटले आहे, की शरद पवारांचा इतिहास गणेश नाईक यांना कितपत माहित आहे, हे मला माहित नाही. पवारसाहेबांनी बाप नाही बदलला ते स्वत:च बाप झालेत. 1977 आणि 1999 साली पक्ष काढला अन् तुमच्यासारखे 60 ते 70 आमदार निवडून आणले. त्याला बाप बदलणं म्हणत नाही. त्याला बाप होणे म्हणतात. माझ्यासारख्या गरीबाच्या पोराला इथपर्यंत आणला ते बाप झाले म्हणून; तुम्ही बाप बदलत गेलात.

बाप बदलणाऱ्याची माझी औलाद नाही, माझा एकच बाप शरद पवार : जितेंद्र आव्हाड

गणेश नाईक तुम्ही कृतघ्न आहात : आव्हाड
एवढेच नाही तर आजच्या तुमच्या विधानाने दाखवून दिले की तुम्ही कृतघ्न आहात. मला हेच नवी मुंबईकरांना दाखवायचे होते. ते मी पुराव्यानिशी मी दाखवून दिले. तुम्ही कधी आगरी समाजाची घरे पाडत असताना गेला नाहीत. मी विटाव्याची घरे पाडत असताना गेलो होतो. जेव्हा-जेव्हा आगरी समाजावर संकट आलं तेव्हा तेव्हा तुम्ही कायद्याची चौकट दाखवत निघून गेलात. पुन:र्सिमांकन झाले पाहिजे, हे दाखवून देण्याची ताकद आमच्यात आहे. ते आम्ही करुन दाखविले. तुम्ही ते नाही केलेत.

आपला राजकीय हेतू साध्य व्हावा, यासाठी आपल्या पोराला बळी दिलात. तेव्हा समाज कुठला? तेव्हा नाईकसाहेब बोलण्यासारखे खूप काही आहे. फक्त मला एवढेच दाखवायचे होते की तुम्ही कृतघ्न आहात; तुमच्यावर केलेल्या उपकारांची तुम्हाला कधीही जाणीव नसते. आगरी समाजाने असो, नवी मुंबईकरांनी असो, ती बाळासाहेबांनी असो अगर ती शरद पवारांनी असो तुम्ही त्यांची जाण कधीच ठेवली नाही. महत्वाचे म्हणजे बाप काढण्याचे विधान तुमचे आहे; मी बाप काढला नाही. कुठल्या तरी फडतूस पिक्चरचा डायलॉग वापरुन तुम्ही बाप काढला होता. त्यामुळे तुम्ही खाली घसरलात की मी हे आठवले तर बरे!, असेही मंत्री आव्हाड यांनी म्हटले आहे.

Jitendra Awhad Vs Ganesh Naik | ...तर पवार साहेबांचाही बाप काढणार का? : गणेश नाईक