धुळे: पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. दोंडाईचा कोर्टात त्यांनी हा दावा दाखल केला. तसंच विखरण भूखंड प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करा अशी मागणीही त्यांनी केली.

5 एकर जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी धर्मा पाटील दोन वर्ष झटत होते. मात्र त्यांना सरकारी दरबारी कुणीही दाद दिली नाही. शेवटी त्यांनी मंत्रालयात विषप्राशन करुन आत्महत्या केली.  त्यानंतर रावल यांनीही याच प्रकल्पाजवळ जमीन घेऊन सरकारी मोबदला लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे.


नवाब मलिक यांनी रावलांवर कवडीमोल भावाने जमिनी हडपल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर रावल यांनी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं होतं.

धर्मा पाटील मृत्यू: रावल, बावनकुळेंवर गुन्हा नोंदवा: नवाब मलिक

रावल म्हणाले, “स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आमच्याकडे 5 हजार एकर जमीन होती.विविध प्रकल्पांसाठी माझ्या आजोबांनी ही जमीन दिली. माझ्याकडे अशी लिस्टच आहे. (रावलांनी अशा जमिनीची लिस्ट दाखवली) माझ्या कुटुंबानं शेकडो एकर जमीन दिली असताना, आमच्या शेतकऱ्याच्या बाबतीत आम्ही असं राजकारण करणार नाही”.

नवाब मलिक काय म्हणाले होते?

जयकुमार रावल आणि कंपनीचा धुळे जिख्यात जमीन खरेदी आणि विक्रीचा धंदा आहे.  एखादा प्रकल्प जाहीर झाला की शेतकऱ्यांकडून कवडीमोलाने जमीन विकत घेतात. रावल कुटुंबीयाने राजपूत नावाच्या शेतकऱ्याकडून सुमारे चार एकर जमीन विकत घेतली.

शिवाय धर्मा पाटील यांची  मंत्रालयातली जमीन मिटिंग जयकुमार रावल यांनीच ऊर्जामंत्री बावनकुळे यांना सांगून रद्द केली होती. त्यामुळे निराश होऊन धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली. प्रकल्प ज्या ठिकाणी येत असेल त्या ठिकाणची जमीन खरेदी करून वाढीव मोबदला सरकारकडून  घेण्याचा प्रकार रावल करतात, असं आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

धर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार

सरकारच्या अनास्थेपायी आत्महत्या केलेल्या 84 वर्षांच्या धर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महेंद्र आणि नरेंद्र या दोन्ही मुलांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. अंत्यविधीसाठी धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.

रात्री उशीरा धर्मा पाटील यांचं पार्थिव धुळे जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी विखरणला पोहोचलं.

धर्मा पाटील यांनी जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात विषप्राशन केलं होतं. सहा दिवसानंतर रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या 

धर्मा पाटील अनंतात विलीन, तगड्या बंदोबस्तात अंत्यसंस्कार!


चुकलं असेल तर धर्मा पाटील यांना व्याजासह मोबदला देऊ : बावनकुळे


मंत्रालयात 80 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर