नाशिक : जवान रॉय मॅथ्यू यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्रकार पूनम अग्रवाल आणि सेवानिवृत्त लष्करी अधिकारी दीपचंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॉय मॅथ्यू यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकमधील आर्टिलरी सेंटरमध्ये 2 मार्च 2017 रोजी रॉय मॅथ्यू यांचा गळफास घेतलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बराकमध्ये आढळला होता. 25 फेब्रुवारीपासून ते बेपत्ता होते.



काही दिवसांपूर्वी एका वेबसाईटच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मॅथ्यू यांनी बडीज ड्युटीच्या नावाखाली जवानांची अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या पिळवणुकीबद्दल तक्रार केली होती. याच घटनेनंतर तणावात असलेल्या मॅथ्यूने आत्महत्या केल्याचं उघड झालं होतं.

पत्रकार पूनम अग्रवाल यांनी सेवानिवृत्त लष्करी अधिकारी दीपचंद यांच्या मदतीने आर्टिलकी क्षेत्रात शूटिंगला मनाई असतानाही, तिथे शूटिंग करुन व्हिडीओ क्लिप्स व्हायरल केल्या. या व्हिडीओ क्लिपमुळे तणावात असलेल्या रॉय मॅथ्यू यांनी आत्महत्या केल्याचा आरोप दोघांवर आहे.



डीएस रॉय मॅथ्यू हा भारतीय लष्कराच्या तोफखाना विभागात अर्थात आर्टिलरीत गनर या पोस्टवर होते.

संबंधित बातमी

तोफांशी खेळणाऱ्या जवानाचा तोफखान्यात गळफास

जवानांची व्यथा मांडणाऱ्या नाशिकमधील बेपत्ता जवानाचा मृत्यू