मुंबई: राज्यासह देशभरात आज जल्लोषात गुढीपाडवा साजरा करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी हिंदू नववर्षाच्या स्वागताची लगबग पाहायला मिळते आहे. तसंच सोशल मीडियावर देखील पाडव्याचा उत्साह पाहायला मिळतो आहे. अनेकजण सोशल मीडियावरुन एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. याबरोबरच सेलिब्रिटीही आपल्या ट्विटर अकाउंटवरुन पाडव्याच्या शुभेच्छा देत आहेत. धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागनं देखील आज पाडव्याच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.


कायम हटके ट्वीट करुन आपल्या चाहत्यांची मनं जिंकून घेणाऱ्या वीरेंद्र सेहवागनं आज थेट मराठीतून पाडव्याच्या शुभेच्छा देऊन सर्वच मराठी माणसांची मनं जिंकली आहेत. सेहवागनं मराठीतून ट्वीट करुन पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


'आपण सर्वांना गुड़ीपाड़व्याच्या हार्दिक शुभेच्छा! आनंद मध्ये प्रेमाने रहावा, खूप मज़ा करा!' अशा शब्दात वीरुनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.



दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही महाराष्ट्रातील जनतेला नववर्षाच्या आणि पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या:

LIVE: राज्यभरात नववर्षाच्या स्वागताची लगबग, विविध ठिकाणी शोभायात्रा

महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा : पंतप्रधान मोदी