मुंबई : डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी या पुरोगामी विचारसरणीच्या व्यक्तींची हत्या होऊन मोठा कालावधी लोटल्यानंतरही तापसयंत्रणा मारेकरी आणि सूत्रधारांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे मारेकरी कधी पकडले जाणार, असा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मुलन समितीच्या सोशल मीडिया विभागाने ‘#JawabDo’ मोहीम सुरु केली आहे.


विवेकवाद्यांचे मारेकरी मोकाटच!

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 ऑगस्ट 2017 रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, अद्यापही डॉ. दाभोलकरांचे मारेकरी सापडले नाहीत. त्याचबरोबर कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे आणि पुरोगामी विचारवंत प्रा. एम. कलबुर्गी यांचे खुनीही मोकाटच आहेत.

‘#JawabDo’ मोहीम काय आहे?

20 ऑगस्ट 2017 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला चार वर्षे पूर्ण होतील. या दिवशी महाराष्ट्र अंनिसकडून सोशल मीडियातून मोठी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेतून विवेकवाद्यांच्या खुनाच्या तपासाच्या दिरंगाईबद्दल सरकारला जाब विचारला जाणार आहे. #JawabDo या हॅशटॅगचा वापर करत, 20 ऑगस्ट 2017 रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सरकारला जाब विचारला जाणार आहे.



देशभरातून मोहिमेला पाठिंबा

विशेष म्हणजे, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी या विवेकवाद्यांच्या खुनाच्या तपासाच्या दिरंगाईबद्दल सरकारला जाब विचारणारी ही मोहीम महाराष्ट्र अंनिससोबतच कर्नाटकातूनही ‘आय अॅम कलबुर्गी’ पेजमार्फतही राबवली जात आहे. केरळ आणि पंजाबमधील विवेकवाद्यांनीही या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

अंनिसचं आवाहन

विविध क्षेत्रातील दिग्गजांचा मोहिमेला पाठिंबा

अंनिसच्या या #JawabDo मोहिमेला विविध क्षेत्रातून मोठा पाठिंबा मिळताना दिसतो आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सुभाष वारे यांसारख्या दिग्गजांनी या मोहिमेला जाहीर पाठिंबा दर्शवत फेसबुक-ट्विटरवर हॅशटॅग वापरत पोस्ट केल्या आहेत.

#JawabDo मोहिमेतील काही निवडक पोस्ट :

https://twitter.com/anjali_damania/status/898824399738068992

https://twitter.com/sonalikulkarni/status/898912955995181056

https://twitter.com/HogadeVinayak/status/888544250597699587