1. आज देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन, राजपथावर घडणार भारतीय संस्कृती आणि संरक्षण सामर्थ्याचं दर्शन, एक हजार ड्रोन्स आणि राफेलसह 75 लढाऊ विमानांच्या कसरती
भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात साजरा होत आहे. सकाळी सव्वा दहा वाजता राजपथावर प्रजासत्ताक दिन सोहळा सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहणार आहेत. सकाळी सव्वा दहा वाजता पंतप्रधान मोदी यांचं राजपथावर आगमन होईल. तर 10 वाजून 23 मिनिटांनी राष्ट्रपती राजपथावर पोहोचतील. सकाळी 10 वाजून 26 मिनिटांनी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर सकाळी साडे दहा वाजल्यापासून राजपथावर संचलन सुरू होणार आहे.
2. राज्यातल्या 10 दिग्गजांचा पद्मपुरस्कारानं गौरव, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण, तर सायरस पूनावाला यांना पद्मभूषण, सुलोचना चव्हाण, डॉ. हिम्मतराव बावस्करांचा पद्मश्रीनं सन्मान
3. ज्येष्ठ माकप नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचा पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार, गायिका संध्या मुखर्जी आणि तबलावादक पंडित अनिद्य चॅटर्जी यांनीही पद्मश्री नाकारला
4. राज्यातली महाविद्यालये 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार, दोन डोस पूर्ण झालेल्यांनाच कॉलेजमध्ये प्रवेश, मंत्री उदय सामंत यांची माहिती
5. पुढच्या 48 तासांत उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात थंडी वाढणार, हवामान विभागाची माहिती, कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागा वाचवण्याचं आव्हान
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 26 जानेवारी 2022 : बुधवार
6. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती नाही, सूत्रांची माहिती, भाजप स्वबळावर लढणार
7. मुंबईतल्या मालाडच्या मैदानाला टिपू सुलतानाचं नाव देण्यावरून वाद, सत्तेसाठी शिवसेना लाचार झाल्याची भाजप नेत्यांची टीका, महापौरांचाही भाजपवर पलटवार
8. मिरा भाईंदरमधील 500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना करमाफी देण्याचा महासभेत ठराव, आर्थिक भाराचं ओझं शासनाकडून अनुदान स्वरुपात घेण्याचा प्रस्ताव
मिरा भाईंदरमधील 500 चौरस फुटापर्यंतच्या सदनिकांना करमाफी देण्याचा ठराव काल (मंगळवारी) महासभेत भाजपानं बहुमतानं मंजूर केला आहे. मिरा भाईंदर महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. या करमाफीच्या निर्णयानं महापालिकेचं आर्थिक कंबरडं मोडलं जाणार असल्याचं मत आयुक्तांनी व्यक्त केलं आहे. तर सेना भाजपाच्या या कलगीतुऱ्यात हा ठराव शासनदरबारी मंजूर होणं कठीण दिसतं आहे.
मिरा-भाईंदरमधील 500 चौरस फुटापर्यंतच्या सदनिकांधारकांसाठी काल (मंगळवारी) भाजपनं नवीन वर्षाच गिफ्ट दिलं आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे पाठोपाठ आता मिरा भाईंदर पालिकेच्या आजच्या महासभेत शहरातील 500 चौरस फुटापर्यंतच्या सदनिकांना कायमस्वरूपी करमाफी देण्याचा ठराव करण्यात आला. त्यास भाजपनं बहुमतानं मंजूर ही करुन घेतलं. मात्र कराची माफी देताना पालिकेच्या तिजोरीवर पडणाऱ्या आर्थिक भाराचं ओझं शासनाकडून दरवर्षी अनुदान स्वरुपात घ्यावा, असाही ठराव मंजूर करण्यात आला.
9. रेल्वे रुळावर उतरुन आंदोलन करणारे आणि मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांना नोकरी नाही, रेल्वे मंत्रालयाचा पत्रक जारी करुन निर्णय
10. कॅन्सर रुग्णांवर उपचार करणं अधिक सोयीस्कर होणार, नवी मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये देशातील पहिली प्रोटॉन थेअरी उपचार यंत्रणा कार्यान्वित
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा