जालना : लोकसभा निवडणुकीच्या निकालात (Lok Sabha Election Result)  महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार मराठा समाजाचे निवडून गेलेत. अर्थात त्याचं कारणही मराठा समाजाने काढलेलं आरक्षणासाठीचं (Maratha Reservation) आंदोलन असल्याचं सांगण्यात येतंय. बीड नवनिर्वाचीत खासदार बजरंग सोनावणे हे मतदान निकालाच्या दिवशीच मध्यरात्री मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange)  भेटीला गेले. त्यानंतर  जालन्याचे नवनिर्वाचित काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे (Kalyan Kale)  हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये गेले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मला शंभर टक्के फायदा झाल्याची कबुली जरांगे भेटीनंतर खासदार डॉ. कल्याण काळे यांनी दिली आहे.


 मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. यावेळी डॉक्टर काळेंनी मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली.  त्यानंतर माध्यमांशी बोलताना  काळे म्हणाले, विजय वडेट्टीवार यांनी  मराठा समाज किंवा मनोज जरांगे यांच्या यांच्या विरोधात टीका केली असेल तर ते चुकीचे आहे.  मात्र वडेट्टीवार यांच्याशी फोनवर बोललो असता त्यांनी याबाबत काहीतरी गैरसमज झाला असून आपण मनोज जरांगे किंवा मराठा समाजाविरोधात बोललो नसल्याचं त्यांनी सांगितले आहे.


शासनदरबारी मराठा समजाच्या मागण्या मांडणार : जरांगे 


काळे म्हणाले, जरांगे यांच्या आंदोलनाचे केंद्र हे जालना लोकसभा मतदारसंघात आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला निश्चितपणे माझा पाठींबा राहणार आहे. परंतु त्याचबरोबर शासनदरबारी मराठा समजाच्या मागण्या मांडव्यात. तसेच लवकरात लवकर जरांगे यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी प्रयत्न करत आहे. 


जरांगेनी खासदारांकडे व्यक्त केली नाराजी 


तर दुसरीकडे काळे यांच्या भेटीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  मनोज जरांगे म्हणाले,  ते कशासाठी आले मला माहित नाही,बसले त्यांनी चर्चा केली.  काँग्रेस मराठ्यांची मते घेत आहेत.   निवडून आले तर आमच्या विरोधात वडेट्टीवार बोलत आहेत. याबाबद्दल मी काळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. 


महाराष्ट्रात 48 पैकी 26 खासदार मराठा


मनोज जरांगे यांनी जालन्यात पेटवलेल्या आंदोलनाची ठिणगी हाहा म्हणता  महाराष्ट्रभर पसरली आणि त्यांनी उभ्या महाराष्ट्रात आंदोलनाचा झंझावात उभा  केला. त्यामुळेच मराठा खासदार जास्त प्रमाणात निवडणून आल्याचा कयास बांधला जातोय. महाराष्ट्रात 48 पैकी तब्बल 26 मराठा खासदार निवडून आले आहेत. 


हे ही वाचा :


Manoj Jarange Video: ज्या जातीचा नेता मराठ्यांना त्रास देणार त्याला विधानसभेला पाडणार, धनंजय मुंडेंचं नाव न घेता मनोज जरांगेंचा इशारा