Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सारोळा गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. करणी केल्याच्या संशयावरून भाऊ-भावजयला मारहाण करत ओल्या कपड्यावर मंदिरापर्यंत धिंड काढली असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीच्या आधारे सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सारोळा गावात देविदास धोंडू पाटील आणि रमेश धोंडू पाटील हे दोन्ही सख्खे भाऊ शेजारी-शेजारी राहतात. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही कुटुंबात वाद आहेत. अशातच शेतीमधील नापिकी आणि गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घरासमोर राहणाऱ्या रमेश धोंडू पाटील यांची पत्नी करणी करीत असावी, असा संशयावरून या दोन्ही कुटुंबात वाद झाले. यातच देविदास धोंडू पाटील यांच्या परिवाराने रमेश पाटील यांच्या पत्नी रंजना पाटील यांच्या अंगावर पाणी टाकून मंदिरात जाऊन खरं-खोटं करण्यासाठी मंदिरापर्यंत ओल्या कपड्याने घेऊन गेल्याचा आरोप रंजना पाटील यांनी केला आहे. 


ही घटना चार दिवसापूर्वी घडली होती, या घटनेनंतर सोमवारी या दोन्ही कुटुंबात वाद निर्माण होऊन मारहाणीचा प्रकार घडला होता. या नंतर रमेश पाटील यांच्या पत्नी रंजना पाटील यांनी पोलिस ठाण्यात जाऊन दिलेल्या फिर्यादीनुसार देविदास धोंडू पाटील परिवारवर जादू टोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रमेश धोंडू पाटील परिवारावरही मारहाण केल्याबदल परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेत फिर्यादी रंजाना बाई पाटील यांनी आपल्या परिवाराची ओल्या कपड्याने मंदिरापर्यंत धिंड काढली, असल्याची तक्रार पोलिसात दिल्याने खळबळ उडाली आहे. या घटने संदर्भात पोलिस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते तपास करीत आहेत.


या घटनेत पोलिसांनी जादू टोणा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत या महिलेवर  कोणी टाकले आणि पाणी टाकून तिची धिंड काढण्यात आली या बाबत पोलिस तपास सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.  या घटने बाबत अंध श्रद्धा निर्मूलन समिती मार्फत ही चौकशी केली जात आहे. अद्याप महिलेची धिंड काढण्यात आल्याचे पुरावे आमच्याकडे आलेले नाहीत, त्याचा तपास सुरू आहे. या घटनेत दोन्ही परिवारातील वैयक्तिक वाद ही असल्याचं संगण्यात येते आहे ,मात्र खरंच धिंड काढण्यात आली असेल तर दोषी वर कारवाई व्हायला हवी,अशी मागणी ही अंध श्रद्धा निर्मूलन समिती कडून करण्यात आली आहे.