Jalgaon News Update : आपलं स्वतःचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असते. मात्र वाढत्या किमती मुळे प्रत्येकालाच ते घेणं शक्य होत नाही. सर्वसामान्य माणसाची ही अडचण लक्षात घेत अतिशय कमी खर्चात कुठेही घेऊन जाता येईल अस फोल्डिंगचे घर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील प्रा नितीन दांडेकर यांनी बनवलं असून या घराची संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चा आहे. 

Continues below advertisement

प्रा नितीन दांडेकर हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील आहेत. या ठिकाणी त्यांचं स्वतःच घर आहे. मात्र त्यांची नोकरी एरंडोल तालुक्यात असल्याने त्यांना पुन्हा एरंडोलमध्ये खूप खर्च करून घर  नको होतं. याच दरम्यान ते एखाद्या घराचा शोध घेत असताना त्यांना नाशिक येथील त्यांचे मित्र अभियंता आणि वास्तुतज्ञ सारंग आणि वैशाली पाटील यांनी अतिशय कमी खर्चात तेही काम झाल्यावर सहजपणे कुठेही घेऊन जाता येईल असं घर होऊ शकतं असा सल्ला दिला.

प्रा नितीन दांडेकर यांना सुरुवातीला यावर विश्वास बसला नाही. मात्र सारंग पाटील यांनी त्यांना त्यांनी बनविलेल्या अनेक घरांच्या साईट दाखविल्या. नंतर प्रा दांडेकर यांना ते पटलं आणि त्यांनी त्याचं बुकिंग करून घेतलं. 

Continues below advertisement

एरंडोल शहरात दांडेकर यांनी दहा बाय सोळा अशा स्वरूपाचं घर बनवून घेतलं आहे. तेगी केवळ एकाच आठवड्यात आणि केवळ दोन लाखांमध्ये सर्व सोई युक्त त्यांचं घर तयार झाल्याने प्रा दांडेकर आणि त्यांचं हे घर चांगलेच चर्चेत आहे.

या घराच्या फायद्याविषयी सांगताना प्रा नितीन दांडेकर सांगताना यांनी म्हटलं आहे की हे घर फ्री फॅब्रिकेट प्रकारातील घर आहे.मजबूत देखील आहे. अजूनपर्यंत कोणतीही अडचण आपल्याला आली नाही. चोरांनी ठरवलं तर कोणतंही घर चोर फोडू शकतात. तसंच हे घर देखील कटरने चोर फोडू शकतात, असंही ते म्हणाले.  सहाशे फूट जागेत त्यात एकशे साठ फुटांचं हे घर आहे.

त्यात सर्व सुविधा करण्यात आल्या आहेत. याला एक लाख नव्वद हजार रुपये खर्च आला आहे. एवढ्या कमी खर्चात एवढ्या सुविधा असलेले घर कुठेच मिळू शकणार नाही, असा त्यांचा दावा आहे. 

सर्वसामान्य जनतेला घर बांधकाम करण्यासाठी परवानग्यांसाठी फिरावे लागते. मजूर आणि कामावर आपला वेळ काढून लक्ष द्यावे लागते. त्यासाठी काही महिने खर्च करावे लागतात. या ठिकाणी मात्र यातील कोणतीच गोष्ट आपल्याला करावी लागली नसल्याने केवळ खर्चच वाचला असे नाही तर वेळ सुद्धा वाचला आहे, त्यामुळे या घरची किंमत येत्या दहा बारा वर्षात वसूल होणार आहे, असं प्रा दांडेकर सांगतात. 

सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे हे घर आपल्याला वाटेल त्या ठिकाणी फोल्डिंग करून घेऊन जाता येणार आणि किंवा त्याला उचलूनही घेऊन जाता येणार असल्याने माझ्यासाठी हे घर म्हणजे आनंद देणारे ठरले आहे, असं प्रा नितीन दांडेकरांनी म्हटलं आहे.  

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha