Jalgaon News Update : छत्रपती शिवाजी महाराज ( Chatrapati Shivaji Maharaj ) यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी भाजप नेते आणि ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. "शिवाजी महाराज यांचा अनादर करण्याचा आपला कोणताही उद्देश नव्हता आणि नाही. मात्र अनवधानाने माझ्याकडून तसं झालं असेल तर आपण त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागत असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी या गोष्टीचं राजकारण होता कामा नये असं देखील  मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. 


पुणे येथील शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री गिरीश महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐकेरी उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका झाली. सर्वच क्षेत्रातून टीका होऊ लागल्यानंतर नरमाईची भूमिका घेत गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे. 
 
"विरोधक विकास कामाबद्दल बोलू शकत नाहीत. त्यामुळे ते माध्यमात जाऊन आपला अनवधानाने बोललेला एखाद शब्द घेऊन त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, आपण महाराजांचे नेहमीच चाहते राहिले आहोत. त्यांचा नेहमीच अनुयायी आहे, महाराजांचा अनादर करण्याचा आपला कोणताही उद्देश नव्हता. तली देखील आपल्याकडून अनवधानाने एकेली उल्लेख झाला असेल तर त्या बदल आपण दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे सांगत गिरीश महाजन यांनी यावेळी म्हटले आहे. याबरोबरच आता हा विषय थांबविण्यात यावा अशी विनंती मंत्री महाजन यांनी केलीय.  


 संजय राऊतांना टोला  


आज पत्रकार दिन आहे. या निमित्त बोलताना मंत्री महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावलाय. "पत्रकार म्हणून संजय राऊत यांना लिहिण्याचा आणि बोलण्याचा अधिकार असला तरी काय बोलावे आणि कसे बोलावे याबाबत त्यांनी आचार संहिता पाळायला हवी, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावलाय. 


दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला देखील मंत्री महाजन यांनी उत्तर दिलं आहे. "शेवटी मुंबई मुंबई असून मुंबईच्या सिने सृष्टीची बरोबरी कोणी करू शकत नाही. योगी आदित्य यांनी आपल्या राज्यात काय चांगल केले आहे ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याचा अर्थ इकडचे सगळे तिकड घेऊन या असं त्यांनी म्हटलं नाही. विरोधकांनी ऊगाच रडीचा डाव खेळू नये, असं गिरीश महाजन यांनी म्हंटलं आहे.


महत्वाच्या बातम्या


Pandharpur : विठ्ठल मंदिराला येणार 700 वर्षापूर्वीचं रूप, गाभाऱ्यातील ग्रॅनाइट फारशा हटणार