पंढरपूर : आगामी आषाढीवारी पूर्वी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील ( Pandharpur Vitthal temple ) विठ्ठल- रुक्मिणी गाभाऱ्यातील ग्रॅनाइट फारशा हटवण्यात येणार आहेत. विठ्ठल मूर्तीला अपायकारक ठरत असल्यामुळे गाभाऱ्यातील मार्बल आणि ग्रॅनाईटच्या फारशा टवण्यात येणार आहेत. 73 कोटी रूपयांच्या आराखड्यातील पहिला टप्पा आषाढीपूर्वी पूर्ण केला जाईल असे मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.


विठ्ठल मंदिर गाभाऱ्यात लावण्यात आलेल्या या चकचकीत फरशांमुळे गाभाऱ्यात उष्णता वाढून विठ्ठल मूर्तीची झीज होत असल्याचे पुरातत्व विभागाने सांगितले होते. मात्र, अनेक वर्षे यावर कोणतेही काम करण्यात आले नव्हते. याबाबत नुकतीच मंदिर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत 73 कोटी रूपयांच्या मंदिर विकास प्रकल्पात पहिल्या टप्प्यात हे काम हाती घेण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली. 
 
विठ्ठर मंदिराला 700 वर्षापूर्वीचे मूळ रूप देण्यासाठी तयार झालेल्या या 73 कोटी रूपयांच्या आराखड्यात काम सुरु करताना पहिल्या टप्प्यात विठ्ठल रुक्मिणी गाभारे, चौखांबी, सोळखांबी याला मूळ रूप दिले जाणार आहे. गाभाऱ्यात जास्तीत-जास्त हवा खेळती ठेवण्यासाठी मूळ मंदिरात जी उपाययोजना होती तीच पुन्हा पूर्ववत केली जाणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले. 


विठुरायाचा गाभारा लहान असल्याने येथे अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवत असतो. त्यामुळेच पूर्वीच्या काळी बनविलेल्या सवणे आणि इतर उपाययोजना पुन्हा सुरु केल्या जाणार आहेत. याशिवाय रुक्मिणी गाभाऱ्यात होत असलेली गळती आणि मंदिरातील निसटू लागलेल्या दगडांची चुन्याचा वापर करून पुन्हा डागडुजी करण्यात येणारआ हे. हे सर्व काम पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. 


मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील हाय पॉवर कमिटीसमोर आता हा अंतिम आराखडा सादर केला जाणार असल्याचे मंदिराचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी सांगितले. मंदिर समिती सदस्य आणि पुरातत्व विभाग आणि आर्किटेक्चर तेजस्विनी आफळे या टीमने नामदेव महाद्वार, पश्चिम महाद्वार, विठ्ठल रुक्मिणी गाभारा, बाजीराव पडसाळी, विठ्ठल सभामंडप यासह दर्शन रांगेची पाहणी करून मंदिर सदस्यांच्या सूचनांची नोंद करण्यात आली. मंदिरात सुरु असणाऱ्या शेकडो वर्षीच्या प्रथा परंपरा कायम ठेवत मंदिराला 700 वर्षापूर्वीचे रूप देणारा आराखडा कसा राबवायचा यावर या पाहणीत निर्णय झाले आहेत. 


महत्वाच्या बातम्या


Solapur News: कुस्ती जिंकण्यासाठी पैलवान करतायत इंजेक्शन्सचा वापर? सोलापुरातील कारावाईमुळे धक्कादायक वास्तव समोर