जळगाव : जळगाव महानगरपालिकेसाठी आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होत आहे. निवडणूक जळगाव शहराची असली तर दोन्ही पक्षातील अनेक नगरसेवक हे ठाणे आणि नाशिकमधून मतदान प्रक्रियेत ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  मनपाच्या आच्या महापौर निवडणुकीच्या अगोदरच सत्ताधारी भाजप मधील काही नाराज नगरसेवक गळाला लागल्याचा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर गेल्या तीन दिवस पासून हे सर्व नगरसेवक मुंबईत अज्ञात ठिकाणी सहलीवर असल्याचं सांगण्यात येत आहे.


शहरात आल्यावर पुन्हा या नगरसेवकांना भाजपकडे वळविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो हे लक्षात घेत शिवसेनेच्या वतीने आज होणाऱ्या निवडणुकीत ठाण्याहूनच ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या मध्ये प्रामुख्याने भाजपला सोडून आलेल्या नगरसेवकांचा समावेश असणार आहे. त्यांच्या सोबत सहा शिवसेनेचे नगरसेवक देखील ठाण्यातूनच मतदान प्रक्रियेत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


जळगाव महापौरपदासाठी शिवसेनेकडून जयश्री महाजन आणि उपमहापौरपदासाठी कुलभूषण पाटील यांचा अर्ज दाखल


दुसरीकडे भाजपचे काही नगरसेवक हे शिवसेनेच्या गळाला लागल्याचं लक्षात घेत भाजपने हे सावध पावले उचलीत उर्वरित काही नगरसेवकांना नाशिकमध्ये अज्ञात स्थळी सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले असून हे नगरसेवक नाशिकमधील अज्ञात स्थळावरून मतदान प्रक्रियेत सहभागी होणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.


Jalgaon | जळगावचा महापौर शिवसेना ठरवणार, तर उपमहापौर आपण ठरवणार; एकनाथ खडसेंचा दावा


त्यामुळे जळगाव मनपाची निवडणूक असली बाहेर गावाहून तिची मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता राज्य शासनाच्या निकषांनुसार ही निवडणूक ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.  याला भाजपच्या वतीने न्यायलायत आव्हान देखील देण्यात आले होते. मात्र न्यायालयाने ऑनलाईन पद्धतीनेच निवडणूक घेण्याचे निर्देश दिल्याने दोन्ही पक्षातील काही नगरसेवक हे ठाणे आणि नाशिक मधून मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.