Jalgaon Jamner Nagarparishad : जामनेर नगर परिषद निवडणुकीत (Jalgaon Jamner Nagarparishad  Election) उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. जामनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत आतापर्यंत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचे भाजपाचे 9 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. जामनेर नगर परिषदेत 27 उमेदवारांपैकी भाजपचे 1 नगराध्यक्ष व  9 नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत.  नगराध्यक्ष पद मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजनांकडे आहे. मात्र नगरपालिकेत भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आणखी 5 जागा मिळवाव्या लागणार आहेत. सध्या जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत 15 जागांवर लढत होणार आहे. 

Continues below advertisement

मुक्ताईनगरमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत होणार 

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारानं माघार घेतली आहे. ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भाग्यश्री जैन यांनी अखेरच्या दिवशी माघार घेतल्याने मुक्ताईनगरमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत होणार आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार व शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील तसेच भाजपच्या उमेदवार भावना ललित महाजन यांच्यात नगराध्यक्षपदासाठी लढत होणार आहे. मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये 17 जागांसाठी लढत होणार आहे. 

शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रतिष्ठा पणाला

एकनाथ खडसे यांनी पक्षाची ताकद नसल्याचे म्हणत नगरपंचायत निवडणुकीतून माघार घेतल्याने मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपनं उडी घेतली आहे. भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वात मुक्ताईनगरमध्ये भाजप शिवसेना शिंदे गटाविरुद्ध लढवणार नगरपंचायतीची निवडणूक. मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत असली तरी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे असा अप्रत्यक्ष सामना होणार आहे. मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Continues below advertisement

चाळीसगाव नगर परिषदेत एकूण सदस्य संख्या ही 37 आहे. नगराध्यक्ष पदाच्या साठी शहर विकास आघाडीच्या पद्मजा देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजपा कडून आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण या निवडणूक लढवत आहेत. आम आदमी पार्टीच्या राहुल भीमराव जाधवतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार समाधान भीमराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.