Bee Attack at Nagpur Mental Hospital : नागपूरच्या शासकीय मनोरुग्णालयातून (Nagpur Mental Hospital) एक अतिशय खळबळजनक घटना समोर आली आहे. मनोरुग्णालयाच्यापरिसरातमधमाश्यांनी हल्ला (Bee Attack) केलाआहे. प्राथमिकमाहितीनुसार, घारीने मधमाशीच्या पोळ्याला छेडल्यामुळे मधमाश्यांच्या घोळक्याने नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात प्रवेशकरतरुग्णालयातील रुग्णांवर हल्ला केला. मधमाश्यांच्या या हल्ल्यात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचीमाहितीआहे. तर 39 रुग्ण जखमी झालेआहे. गुरुवारी दुपारी वॉर्ड क्रमांक चार आणि पाच जवळ रुग्ण जेवणाला बसले असताना मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला.

Bee Attack at Nagpur Mental Hospital : 60 वर्षीय रुग्णाचा मृत्यू; 39 मनोरुग्णांसह 2 कर्मचारी जखमी

मधमाशांच्या या हल्ल्यात 39 रुग्ण आणि दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. तर 60 वर्षीय रुग्ण किसन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, मनोरुग्णालयाच्या 40 एकर परिसरात दाट झाडे आणि वृक्ष आहेत. रुग्णालयातीलच झाडावर हे मधमाशांचं पोळं होत.यादरम्यान घारीने मधमाशीच्या पोळ्याला छेडल्यामुळे मधमाश्यांच्या घोळक्याने नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात प्रवेशकरतरुग्णालयातील रुग्णांवर हल्ला केला. तरजखमींवरसध्याउपचारसुरुअसल्याचीमाहिती वैद्यकीय अधीक्षक सतीश हुमणे यांनीदिलीय.

Akola News : अकोल्यात बिबट्या दिसल्याचा नागरिकांचा दावा! वनविभाग म्हणतो, बिबट नसून दुसराच प्राणी

अकोला (Akola News) शहरातील न्यू तापडियानगर भागात आज पहाटे बिबट्या दिसल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केलाय. विलास बंकावार या पोलीस कर्मचार्याच्या घरात बिबट्या घुसल्याचा दावा त्यांच्या कुटूंबियांनी केलाय. घरातील जिन्याच्या पायर्यांवर हा प्राणी बसलेला घरातील पाहुण्या महिला पुष्पा तुम्मे यांना दिसलाय़. त्यानंतर नागरिक बिबट्या म्हणत असलेल्या या प्राण्याने जिन्याच्या खिडकीची तावदानं फोडत बाहेर उडी मारलीय. या घटनेनंतर या भागात वनविभाग आणि पोलीस दाखल झाले.

प्राथमिक तपासणीनंतर वनविभागाने या प्राणी बिबट्या नसल्याचं म्हटलंय. बिबट्याच्या कोणत्याही खुणा आणि पगमार्क परिसरात आढळून आले नसल्याचे म्हटले. तर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन वनविभागाने केलंय. हा प्राणी मोठी रानमांजर किंवा तरस असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केलाय. मात्र, नागरिक हा प्राणी बिबट्याच असल्याच्या दाव्यावर ठाम आहे.