Jalgaon Gold News : आज आहे गुरुपुष्यामृत योग (Guru Pushyamrut Yog 2022). साडेतीन मुहूर्तांपैकी प्रमुख मुहूर्त असलेल्या दसरा, दिवाळी आणि गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ज्या पद्धतीने जळगावच्या (Jalgaon) सुवर्णनगरीत सोने (Gold) खरेदीचा मुहूर्त साधला जातो. त्याच पद्धतीने तो गुरूपुष्यमृतच्या मुहूर्तावर देखील साधला जातो. आज सकाळपासून पाहिल्यास, जळगावच्या सुवर्णनगरीत याच निमित्ताने सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.


गेल्या दोन वर्षांचा काळ पाहता कोरोनाच्या (Covid-19) महामारीमुळे जळगावच्या सुवर्णनगरीत सोने खरेदीसाठी ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. यावर्षी मात्र, कोरोनाचे निर्बंध हटविण्यात आले असल्याने व्यावसायिक आणि ग्राहकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. जळगावच्या सुवर्ण नगरीत ग्राहकांची सोने खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. 


सोने खरेदीचा शुभ मुहूर्त (Gold Purchase Shubh Muhurat) : 


महाराष्ट्रात ज्याप्रमाणे गुढीपाडवा, दसरा, लक्ष्मी पूजन या शुभमुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योग (guru pushyamrut yog) या दिनाच्या दिवशी देखील सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या दिवशी सोन्याची खरेदी करणं शुभ मानले जाते. तसेच बरकत देणारे असते अशी ग्राहकांची श्रद्धा आहे. आणि त्यामुळेच आजच्या दिवशी जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. 


ग्राहकांमध्ये मोठा उत्साह :


या संदर्भात, ग्राहकांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली असता ग्राहकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. एका ग्राहकांनी असं म्हटलं की,'गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने आमच्या घरी सोने खरेदी करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. या मुहूर्तावर सोने खरेदी करणे बरकत देणारे मानले जाते.' तर दुसऱ्या ग्राहकांनी असं म्हटलं आहे की, ही एक चांगली गुंतवणूक देखील असल्याने आम्ही आजचा मुहूर्त साधण्यासाठी आलो आहोत.' अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या आहेत. 
तर, आजची सोने खरेदी ही शुभ असल्याने अनेक ग्राहक आजच्या दिवशी सोने खरेदीसाठी नेहमीच गर्दी करत असतात. 


महत्वाच्या बातम्या :