Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी यांच्याविरोधात रिपबल्किन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज जळगावमध्ये त्यांच्या विरोधात आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. मागास वर्गीय तरुणांना रोजगार देता यावा, यासाठी महार वतनाच्या जमिनीवर साखर कारखाना उभारणीचे स्वप्न दाखवत एकनाथ खडसेंनी कमी दरात जमिनी खरेदी केल्याचा आरोप होत आहे. या जमिनी परत मिळण्याच्या मागणीसाठी रिपबल्किन पार्टी ऑफ इंडिया तर्फे आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. 

Continues below advertisement


एकनाथ खडसेंनी त्यांच्या मंत्री पदाच्या काळात महार वतनाच्या जमिनी खरेदी केल्याचा आरोप


पुणे येथे सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सध्या एकनाथ खडसे यांनी पार्थ पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरु केला आहे. जळगावमध्ये त्यांच्याच विरोधात आता महार वतनाच्या जमिनी त्यांनी साखर कारखाना उभारुन देण्याचे स्वप्न दाखवत कमी दरात खरेदी केल्याचा आरोप रिपाई कडून करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील काही शेतकऱ्यांच्या जमिनी खडसे यांनी त्यांच्या मंत्री पदाचा उपयोग करत खरेदी केल्या होत्या. मात्र आजपर्यंत साखर कारखाना उभा राहिला नसल्याने खडसे यांनी या जमिनी परत कराव्या अशी मागणी रिपाइं तर्फे करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात या जमिनी परत केल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


पुण्यातील कोरेगावमधील 40 एकर जमिनीच्या खरेदीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ( Ajit Pawar) चिरंजिव पार्थ पवार (Parth Pawar) अडचणीत सापडले आहेत. तब्बल 1804 कोटी रुपये किंमतीची ही जमीन केवळ 300 कोटी खरेदी झाल्याचा समोर आले आहे. याच मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाबाबत एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केल आहे. 


पार्थ पवार प्रकरणावर नेमकं काय म्हणाले होते एकनाथ खडसे?


पार्थ पवार यांच्यावर ज्या जमिनीच्या बाबत आरोप होत आहेत, ती जमीन महार वतनाची नाही तर सरकारची जमीन आहे. याबाबत आपल्याकडे पुरावे आहेत, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. एकनाथ खडसे यांनी या जमिनीचा मागचा इतिहासच माध्यमांच्या पुढे जाहीर केला आहे.


महत्वाच्या बातम्या:


पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण! ती जमीन महार वतनाची नाही तर... एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट