Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात (Jalgaon Chopda Crime)  एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून तरुणासह तरुणीची हत्या (Love Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी पहाटेच्या सुमारास समोर आल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तरुणाची बंदुकीने गोळी मारून तर तरूणीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. तरुणीच्या 17 वर्षीय अल्पवयीन भावानेच दोघांचा जीव घेतल्यानंतर तो स्वतः पिस्तुलासह पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. वर्षा कोळी (वय 20, रा. सुंदरगगढी, चोपडा ) आणि राकेश संजय राजपूत (वय, २२, रा. रामपूरा चोपडा) अशी मयत प्रेमीयुगलाची नाव आहेत.


चोपडा शहर पोलीस स्थानकात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा पिस्टल घेऊन पोलिसात हजर झाला आणि आपण दोघांचा खून केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी चोपडालगत जुना वराड रोड शिवारात पाहणी केली असता नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी दोन अल्पवयीन भावासह एक अशा दोन संशयितास ताब्यात घेतले आहे. तर आणखी दोघांचा शोध सुरु आहे. 


प्रेम संबंधातून खून झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी मयत तरुणीचा संशयित अल्पवयीन भावानेच दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांविरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले हे करीत आहेत.


दोघांना पळून जाण्याचा बेत होता, त्यापूर्वीच मुलीच्या भावाने दोघांचा जीव घेतला...


राकेश संजय राजपूत याचे वर्षा कोळी हिच्यावर प्रेम होते. राकेश हे वर्षा हे दोन्ही शुक्रवारी रात्री पळून जाणार होते. याबाबतची माहिती वर्षाच्या लहान भावाला कळली. तो बहिणीवर लक्ष ठेवूले. त्यानंतर राकेश हा वर्षा हिच्या घरी आला. यावेळी लहान भावासह इतर तीन जणांनी राकेशला तसेच वर्षा या दोघांना दुचाकीवर बसवून चोपडा ते वराडे रोडलगत असलेल्या नाल्याजवळ आणले. याठिकाणी वर्षाच्या भावाने राकेशच्या डोक्यात गोळी झाडून त्याचा खून केला. त्यानंतर लहान भावाने बहिण वर्षाचा रुमालाने गळा दाबून तिचा जीव घेतला. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन मृतदेह ताब्यात घेतले आहेत. चोपडा शहरातील तरुण राहत असलेला रामपुरा तसेच तरुणी राहत असलेल्या सुंदरगढी भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.