जळगाव : भारत-पाक सीमेवरच्या तणावाचा फटका जळगावच्या प्रसिद्ध केळ्यांनाही बसला आहे. पाकिस्तानात होणारी भारतीय केळ्यांची आयात पाकिस्तानाने अचानक बंद केली आहे.
पाकमधील निर्यात बंद झाल्यामुळे केळी उत्पादकांवर संकट कोसळलं आहे. 1300 रुपये दराची केळी मागणीअभावी 950 रुपये दराने होत आहेत.
गेल्या तीन वर्षात केळीच्या उत्पादनात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर पाकिस्तानने केळीची आयात सुरु केल्यामपळे केळी उत्पादकांना सुगीचे दिवस आले होते. पाकिस्तानने 80 टक्के केळीची आवक पुन्हा बंद केली.
जळगावातील 70 टक्के शेतकरी यामुळे संकटात सापडला आहे. मात्र केळीची निर्यात पुन्हा सुरळीत करण्याची मागणी उत्पादक शेतकरी करत आहेत.