Jalgaon Accident : जळगाव (Jalgaon)  जिल्ह्यात मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Nagpur National Highway)  पिंपरी बुद्रुक फाट्यावर दुचाकी आणि ट्रक यांच्यामधे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कबीर मठातील महंत प्रियरंजनदास ( (Mahant Priyaranjan Das of Kabir Math) हे जागीच ठार झाले आहेत. तर त्यांना घेऊन जात असलेला दुचाकी चालक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर संध्याकाळी पिंपरी  बुद्रुक फाट्यावर दुचाकी व ट्रक यांचा अपघात होऊन दुचाकीवर बसलेले कबीर मठातील महंत (पिंपरी बुद्रुक) प्रियरंजनदास (वय 35 वर्ष) हे जागीच ठार झाले. तर दुचाकी चालक प्रवीण नारायण पाटील वय 23 वर्ष हा युवक गंभीर जखमी झाला. त्यास एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले आहे.

नेमका कसा घडला अपघात?

महंत प्रियरंजनदास आचार्य हे एका चार चाकी वाहनाने जळगावहून पिंपरी फाट्यावर उतरले. त्यांना पिंपरी बुद्रुक येथे नेण्यासाठी प्रवीण नारायण पाटील हा युवक दुचाकी घेऊन आला होता. महंत दुचाकीवर बसले तोच ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे महंत हे जागीच गतप्राण झाले. मृत महंत हे जवळपास चार वर्षापासून पिंपरी बुद्रुक येथील कबीर मठात आचार्य म्हणून सेवा देत होते. विशेष हे की महंत प्रियरंजनदास हे बंगळुरु येथे कबीर पंथी  धार्मिक कार्यक्रमासाठी 15 दिवस हजेरी लावून पिंपरी बुद्रुक येथे परत येण्यासाठी वाहनाने हायवे फाट्यावर उतरले होते. चारचाकी वाहनातून उतरुन दूचाकी वर बसले असता, क्रूर काळाने त्यांच्यावर घाला घातला. यामध्ये ते जागीच ठार झाले. त्यांच्या या अपघाती निधनामुळे  कबीर पंथी नागरिकांमध्ये शोक कळा पसरली आहे. महंत प्रियरंजनदास यांचा मृत्यू झाल्याचे कळताच मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर आल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती.

सांगली जिल्ह्यातील विटा शहरातही भीषण अपघात, महिलेचा जागीच मृत्यू

सांगली (Sangli) जिल्ह्यातील विटा (Vita) शहरात देखील अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. विटा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या एका दुचाकीला डंपरने धडक दिली आहे. यामध्ये एका महिलेचा चिरडून जागीच मृत्यू (Women Death) झाला आहे. प्रमिला तांबे (वय 62) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.  दुचाकीवरील चालकही जखमी झाला आहे. अपघातानंतर डंपर चालकास पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

खळबळजनक, बीडमधील बेपत्ता होमगार्ड महिलेचा मृतदेह आढळला; विट्यात डंपरखाली चिरडून महिला ठार