Ajit Pawar : मला नागपुरात (Nagpur) उपमुख्यमंत्रीपदाचा विजयगड बंगला मिळाला आहे. नागपूरच्या या बंगल्यात मी लोकांच्या तक्रारी कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी खास स्टाफ नेमला आहे. त्या स्टाफने मला सांगितले आहे की, या कार्यालयात जिल्हाध्यक्षासह पदाधिकारी येतच नाहीत. जे येतात त्यांच्या तक्रारी आम्ही ऐकून घेतो आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  म्हणाले. जे तक्रारी घेऊन माझ्या बंगल्यातील कार्यालयात येतात, त्यांना माझा स्टाफ संबंधित कार्यालयात घेऊन जातो आणि तक्रार सोडवण्याचा प्रयत्न करतो असे अजित पवार म्हणाले. कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये आपली प्रतिमा चांगली ठेवली पाहिजे. नाहीतर आमच्या आणि पक्षाच्या नावावर कोणी पदाधिकारी आपली दुकानदारी करणार असेल, तर त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी माझी आहे असे अजित पवार म्हणाले. 

तुम्ही मला कामाची यादी द्या, मी अधिकाऱ्यांना देतो 

सर्व तक्रारी 100 टक्के सोडवता येत नाहीत. तुम्ही मुख्यमंत्री झाल्या तरी ते सोडवू शकत नाहीत. माझ्या स्वभाव असा आहे की जे न होणारे काम असतात त्याबद्दल मी लगेच सांगून देतो. विदर्भातील पदाधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही मला कामाची यादी द्या. मी अधिकाऱ्यांना ती यादी देतो आणि सांगतो की यादीतील नावं असलेले कार्यकर्ते काम घेऊन आले तर ते काम अजित पवाराने सांगितले आहे असे समजून कार्यकर्त्यांचे काम करा असे अजित पवार म्हणाले. मात्र याद रखा राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असून ते नागपूरचे आहेत. त्यामुळं ते जेव्हा नागपूरात असतात, तेव्हा अधिकाऱ्यांना प्रोटोकॉलप्रमाणे त्यांच्यासोबत असणे आणि त्या संदर्भातील काम करणे आवश्यक असते असे अजित पवार म्हणाले.

घरी बसून काम होणार नाही

माझ्या नागपुरातील बंगल्यातील कार्यालयात कोण कोण येतो, त्याची नोंदवाहीत नोंद घेतली जाते. आजही सर्व पुरावे कोणकोण काम घेऊन तिथे आले हे उपलब्ध आहे. घरी बसून म्हणणार असाल की माझे काम करा, तर असं होणार नाही. हे युतीचे सरकार असल्याचे अजित पवारम्हणाले. 

तुम्ही काम केलं म्हणून लोक मतं देतात, हे समीकरण डोक्यातून काढून टाका

तुम्ही काम केलं म्हणून लोक मतं देतात, हे समीकरण डोक्यातून काढून द्या. कोणत्या कामाला महत्त्व देतात हे लोक पाहत असतात. महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षात होती. तरी त्यांच्या 31 जागा निवडून आल्या आणि आम्ही सत्तेत होतो तरी आमच्या 17 जागा निवडून आल्याचे अजित पवार म्हणाले. कार्यकर्त्याने अधिकाऱ्यांना सांगितलेला काम नियमात बसणारं असलं पाहिजे. नियमाच्या बाहेरचे काम अधिकाऱ्यांवर दबाव आणला तरी तो कसं करणार? अधिकाऱ्याला सांगायचं काम तुमचं वैयक्तिक नसावं, तो सार्वजनिक हिताचा काम असावा असे अजित पवार म्हणाले. 

ऑक्टोबरपर्यंत मी विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेणार 

कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये आपली प्रतिमा चांगली ठेवली पाहिजे. नाहीतर आमच्या आणि पक्षाच्या नावावर कोणी पदाधिकारी आपली दुकानदारी करणार असेल, तर त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी माझी आहे. पक्षात महिला वर्गाचा सन्मान ठेवा असे अजित पवार म्हणाले. तुम्ही अधिकाऱ्यांकडे योग्य काम घेऊन गेले आणि त्यांनी काम केले नाही तर मला सांगा. मी त्या अधिकाऱ्याची कान उघाडणी करेल असे अजित पवार म्हणाले. काही पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिली तरी त्यांची 50 मत घेण्याची ही शक्ती नसते.. तुम्ही जेव्हा उमेदवारी मागतात तेव्हा जनमानसात चांगली प्रतिमा असते आवश्यक आहे. तुम्ही जर लोकांसाठी धावून जाणार असेल तरच पक्ष मजबूत होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या:

Rohini Khadse on Suraj Chavan Resignation : अजितदादांनी मोठ्या लाडक्या माशाला वाचवण्यासाठी लहान माशाचा बळी दिला, सूरज चव्हाणच्या राजीनाम्यानंतर रोहिणी खडसेंचा हल्लाबोल