Ajit Pawar on Shivraj Rakshe : अहिल्यानगरमध्ये झालेली 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही मोठ्या वादामुळे चर्चेत राहिली. गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) विरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol) यांच्यात झाली. बी लढत सुरु असतानाच मोहोळच्या एका डावात राक्षे पाठीवर आला अन् पंचांनी राक्षेला थेट बाद घोषित केलं. त्यामुळं ही लढत पृथ्वीराज मोहोळने जिंकली. पण, शिवराज राक्षेने पंचांच्या निर्णयाला विरोध करत पंचांची कॉलर धरली आणि त्यानंतर थेट लाथ मारली. या घटनेनंतर वाद चांगलाच पेटला आहे. या संपूर्ण घटनेवर राज्याचे उपमुख्य़मंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणं योग्य नव्हते 


कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणं योग्य नव्हते असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. न्याय मागताना संयम बाळगणे आवश्यक असल्याचेही अजित पवार म्हणाले.


शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड तीन वर्षांसाठी निलंबित


महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यात पंचांशी हुज्जत घालणं पैलवन शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडला चांगलंच भोवलं आहे. या दोनही पैलवानांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने (Maharashtra State Wrestling Association) घेतला आहे. त्यामुळे पुढच्या तीन वर्षांसाठी या दोन्ही पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी ही माहिती दिली. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. उपांत्य सामन्यात पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आणि शिवीगाळ केली. तर अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाड याने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत मैदान सोडलं. त्यावेळी त्याने पंचांना शिवीगाळही केली. यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेची एक बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये या दोनही पैलवानांवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली. 


कृषी विभागात सर्वाधिक AI तंत्रज्ञान वापर करत उत्पादन क्षमता वाढवा,अजित पवारांची आदेश


एआय तंत्रज्ञान कृषी क्षेत्रात वापर करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बैठक घेतली. 
या बैठकीला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, कृषी आयुक्त, कृषी सचिव यांसह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थितीत होते. कृषी विभागात सर्वाधिक AI तंत्रज्ञान वापर करत उत्पादन क्षमता वाढण्याचे  आदेश  अजित पवार यांनी कृषी विभागाला दिले आहेत. कृषी विभागात एआय तंत्रज्ञान वापर करण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी सूचना पवार यांनी दिल्या आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Kesari : शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड तीन वर्षांसाठी निलंबित, पंचासोबत हुज्जत घालणं भोवलं