वर्धा : गावोगावी सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शाळा उघडल्या असताना आजही कॉन्व्हेंट संस्कृतीची छाप लोकांच्या मनावर आहेच. मात्र, या परिस्थितही शिक्षकांनी ‘तन मन धन’ लावून परिश्रमाने नावारुपास आलेली जिल्हा परिषदेची शाळा आता कॉन्व्हेंट संस्कृतीला चांगलाच पर्याय ठरत आहे. जिल्हाधिकारी शैलश नवाल यांनीही सेवाग्राम येथील हावरे ले आउटच्या शाळेला भेट देऊन कौतुक केलं.


 

शाळेला हे आयएसओ मानांकन मिळावीण्यासाठी 40 कसोट्यांवर खरं उतरावं लागलं. त्यानंतर हे नामांकन मिळालं. विशेष म्हणजे शाळेतील आवरापासून आतमध्ये असलेला भिंतीवरील एकूण एक भाग बोलका, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा याला तोडचं नाही. इमारत जरी जिल्हा परिषदेच्या फंडातून असली तरी डोळे दिपवणारी सगळी सजावट केली दोन शिक्षकांनी आणि तेही स्वताच्या पगारातून.



सुरवातील ही शाळा अंगणवाडीत भरायची. आता हक्काची जागा मिळाली आणि परिसरातील इतर शाळांना तोड देणारा पर्याय. त्यामुळं कॉन्व्हेंटला शिकणारे विद्यार्थीही आता मोफत शिक्षण घेत आहेत. इथं त्याला आता खेळीमेळीच्या वातावरणात मन रमायला लागलं आणि त्याची अभ्यास गोडी  वाढल्याचं तो आवर्जून सांगतो आहे.

 

शाळेचा परिसर बोलका आहे म्हणून चागलं आहे असं नाही. जेव्हा जिल्हाधिकारी नवाल यांनी विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला तेव्हा दर्जाही तेवढाच चांगला असल्याचं त्यांचा निदर्शनास आलं. त्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुकही केलं.

 

जिल्हा परिषदेच्या शाळेची आता गुणवत्ता वाढत आहे. त्यामुळ कॉन्व्हेंटच्या नावानं गुणगान करणाऱ्यांनी या शाळांना एकदा तरी भेट देण्याची गरज आहे.