पुणे : समृद्ध जीवनचे संस्थापक महेश मोतेवारची पत्नी लीना मोतेवारला अटक करण्यात आली आहे. सीआयडीने बुधवारी रात्री ही कारवाई केली. अनेक कंपन्यांमधील गैरव्यवहाराप्रकरणी लीना मोतेवारला अटक केली आहे.
समृद्ध जीवन चिटफंडच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सीआयडी महेश मोतेवारची चौकशी करत आहे. या तपासातून ज्या बाबी समोर आल्या, त्यानंतर आता लीना मोतेवारला अटक करण्यात आली आहे.
लीना मोतेवार ही समृद्ध जीवनचे संस्थापक महेश मोतेवारसह अनेक कंपनीच्या संचालिका आहे. या कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. या गैरप्रकारात लीना मोतेवारही सहभागी असल्याने सीआयडीच्या पथकाने तिला अटक केली.
समृद्ध जीवनच्या महाराष्ट्र, ओरिसातील 58 कार्यालयांवर सीबीआय छापे दरम्यान, काही दिवसांपूर्वीच लीना मोतेवारचे चार किलो सोने चोरीला गेल्याची घटना उघड झाली होती.