सिंधुदुर्ग: पनवेल, दिव्याजवळील रेल्वे ट्रॅकवर रुळाचे तुकडे टाकल्याची घटना ताजी असतानाच आता असाच  एक धक्कादायक प्रकार आज समोर आला. कोकण रेल्वेवरील खारेपाटण-चिंचवली दरम्यान ट्रॅकवर अज्ञातानं लोखंडी प्लेट ठेवल्याचं आढळून आलं. सुदैवानं मालगाडी चालकाला ही गोष्ट वेळीच लक्षात आल्यानं मोठा अपघात टळला.


दुपारी तीन वाजेच्या सुमारास खारेपाटण-चिंचवली इथं रुळावर अज्ञातानं लोखंडी प्लेट ठेवल्याचं मालगाडी चालकाला दिसून आलं. त्यावेळी चालकानं प्रसंगावधान राखल्यानं मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर चालकाने तात्काळ या घटनेची वैभववाडी स्टेशन मास्तरांना कल्पना दिली. काही वेळानं ती लोखंडी प्लेट काढून टाकण्यात आली आणि कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली. याप्रकरणी रेल्वेकडून कणकवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस या

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पनवेलजवळ रेल्वे रुळावर वीजेचा पोल टाकण्यात आला होता. तर नवी मुंबईतील रेल्वे ट्रॅकवर जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. त्यामुळे रेल्वेला टार्गेट करुन मोठा घातपात घडवण्याचा कट शिजत असल्याची भीती वर्तवली जात आहे.

गेल्या आठवड्याभरात रेल्वे ट्रॅकवर अपघाती वस्तू ठेवण्याची ही सहावी घटना आहे. याआधी पनवेलमध्ये गव्हाणफाटाजवळ रेल्वे रुळावर वीजेचा पोल टाकण्यात आला होता. तर त्याआधी कळंबोलीजवळ रेल्वे ट्रॅकवर रुळाचा तुकडा ठेवण्यात आला होता.

रेल्वे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर?

गेल्या महिन्यात ओदिशाच्या सीमेजवळ असलेल्या आंध्र प्रदेशमधील कुनेरु स्टेशनजवळ जगदलपूर-भुवनेश्वर एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरुन घसरले होते. या रेल्वे अपघातात 39 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता.

कानपूरमध्येही नोव्हेंबरमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेमागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंदूर-पटना एक्स्प्रेसचा 20 नोव्हेंबर 2016 रोजी कानपूरच्या पुखराया स्टेशनजवळ भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये 150 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या:

नवी मुंबईत रेल्वे रुळांवर विजेचा खांब, घातपाताचा संशय

दिवा-पनवेल मार्गावर मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला

अकोल्यात रेल्वे ट्रॅकवर दगड ठेऊन घातपाताचा प्रयत्न 

उभ्या रेल्वे ट्रॅकवर आडवा ट्रॅक, मुंबईत जनशताब्दी पाडण्याचा प्रयत्न?

पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे 14 डबे घसरले, 63 प्रवाशांचा मृत्यू

हिराखंड एक्स्प्रेसचे 8 डबे घसरुन 39 प्रवाशांचा मृत्यू