सोन्या-चांदीसह लाखो रुपयांवर डल्ला, हैदराबादमधील चोरांना नांदेडमध्ये अटक
एबीपी माझा वेब टीम | 14 Feb 2017 05:59 PM (IST)
NEXT PREV
नांदेड: तेलंगणातल्या हैदराबादमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी नांदेड पोलिसांनी तिघांना जेरबंद केलं आहे. सोमवारी दुपारी हैदराबादमध्ये घरफोडी करुन 20 लाखांची रोकड, 1 किलो सोनं आणि चार किलोंची चांदी लंपास करण्यात आली होती. ही चोरी सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता आरोपी चोरीचा माल नांदेडमार्गे मध्यप्रदेशात घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. हैदराबाद पोलिसांनी ही माहिती नांदेड पोलिसांत दिली आणि सापळा रचून या चोरांना अटक करण्यात आली. तीनही चोरांकडून सगळा मुद्देमाल हस्तगत करुन हैदराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.