मुंबई : राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी आजपासून संपाचं हत्यार उपसलं आहे. स्टायपेंड अर्थातच विद्यावेतनामध्ये वाढ करावी अशी प्रशिक्षणार्थींची प्रमुख मागणी आहे.


अचानक प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर जाणार असल्याने रुग्णसेवेला फटका बसण्याची शक्यता आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात खूप कमी विद्यावेतन दिलं जातं. सर्वच राज्यांमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना 15 ते 30 हजारांपर्यंत स्टायपेंड म्हणजेच विद्यावेतन दिलं जातं. मात्र महाराष्ट्रात सर्वात कमी 6 हजार रुपयेच प्रशिक्षणार्थींना दिले जातात.

काल मंगळवारी अस्मी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेची राज्य सरकारसोबत बैठक झाली, मात्र लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे आजपासून त्यांनी संप पुकारला आहे. या संपात बीएमसी हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरही सहभागी असतील.

काय आहेत संपकऱ्यांची मागणी?

विद्यावेतन हे सध्याच्या 6000/- पासून वाढवून 15000/- इतके करावेत

वाढीव विद्यावेतन फेब्रुवारी 2018 पासून लागू करण्यात यावे.

विद्यावेतनात वेळोवेळी संशोधन करुन ते वाढवण्यात यावे.