मुंबई/अमरावती : अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्या खळबळजनक मेसेजमुळे, त्यांच्यावर  शिस्तभंगाची कारवाई होण्याची  शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यानं जातीवाचक टिप्पणी केल्यानं ही कारवाई होऊ शकते.

आज यासंदर्भात पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी अतिरिक्त गृहसचिव के.पी.बक्षी यांची भेट घेतली. बक्षींनी या प्रकरणाचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

मराठा असल्यानं माझा छळ: अमरावती आयजी

अमरावती विभागाचे आयजी विठ्ठल जाधव यांच्या एका व्हॉट्सअप मेसेजनं पोलीस दलात खळबळ उडाली आहे.  मी जातीनं मराठा असल्यानं वरिष्टांकडून माझा छळ सुरु असल्याचा आरोप त्यांनी या मेसेजमध्ये केला.

तसंच योग्य कारवाई न झाल्यास माझ्या आत्महत्येस पोलीस महासंचालक माथूर जबाबदार असतील,असंही त्यांनी या मेसेजमध्ये म्हटलं आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या मोबाईलशिवाय सोशल मीडियातही हा मेसेज व्हायरल झाला आहे.

बुलडाण्यातील आश्रमशाळा बलात्कारप्रकरण उघड झाल्यानंतर, विठ्ठल जाधव यांनी अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक या नात्याने तिथे हजेरी लावणं आवश्यक होतं. मात्र तसे न झाल्याने गृहविभागाने त्याबाबत खुलासा मागवला होता.

मात्र त्यानंतर विठ्ठल जाधव यांचा हा मेसेज व्हायरल झाला आहे.

संबंधित बातमी

मराठा असल्यानं माझा छळ: अमरावती आयजी