Indian Railway : 2022 च्या गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे 32 अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालविणार आहे. या विशेष गाड्या आधीच घोषित केलेल्या 74 गणपती विशेष गाड्यांव्यतिरिक्त आहेत.  या अतिरिक्त 32 गणपती विशेष रेल्वेच्या वेळा, त्यांचे स्टेशन आणि संरचनेत कोणताही बदल झालेला नाही. या नेमक्या कोणत्या गाड्या आहेत ते जाणून घ्या

  


1. मुंबई- सावंतवाडी दैनिक विशेष (16 सेवा)


01137 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि. 13.8.2022 ते 20.8.2022 (8 सेवा) दररोज 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 14.00 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.  


01138 विशेष सावंतवाडी रोड  येथून दि. 13.8.2022 ते 20.8.2022 (8 सेवा) दररोज 14.40 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 03.45 वाजता  पोहोचेल.


2.  नागपूर - मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष (6 सेवा)


01139 विशेष नागपूर येथून दि. 13.8.2022, 17.8.2022 आणि 20.8.2022 (3 सेवा) रोजी 15.05 वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी 17.30 वाजता  पोहोचेल.  


01140 विशेष मडगाव येथून  दि. 14.8.2022, 18.8.2022 आणि 21.8.2022 (3 सेवा) रोजी रोजी 19.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 21.30 वाजता नागपूर येथे पोहोचेल.


3.  पुणे - कुडाळ विशेष (2 सेवा)


01141 विशेष गाडी दि. 16.8.2022 रोजी पुणे येथून 00.30 वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी 14.00 वाजता  पोहोचेल.


01142 विशेष दि. 16.8.2022 रोजी कुडाळ येथून 15.30 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी 06.50 वाजता पोहोचेल.


4.  पुणे-थिविम/कुडाळ-पुणे विशेष (4 सेवा)


01145 विशेष पुणे येथून दि. 12.8.2022 आणि 19.8.2022 रोजी 17.30 वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी 11.40 वाजता  पोहोचेल.


01146 विशेष कुडाळ येथून  दि. 14.8.2022 आणि 21.8.2022 रोजी 15.30 वाजता सुटेल आणि पुणे येथे  दुसऱ्या दिवशी 05.50 वाजता पोहोचेल.


5.  पनवेल - कुडाळ/थिवि - पनवेल विशेष (4 सेवा)


01143 विशेष पनवेल येथून दि. 14.8.2022 आणि 21.8.2022 रोजी 05.00 वाजता सुटेल आणि त्याच कुडाळ येथे त्याच दिवशी 14.00 वाजता  पोहोचेल.


01144 विशेष थिवि येथून दि. 13.8.2022 आणि 20.8.2022 रोजी 14.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे  दुसऱ्या दिवशी 02.45 वाजता  पोहोचेल.


आरक्षण : सर्व गणपती विशेषचे विशेष शुल्कासह बुकिंग 8.7.2022 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.


या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.


प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविडचे योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.


महत्वाच्या बातम्या :