मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र तरीही बरेचसे लोक संचारबंदी आणि लॉकडाऊनचे नियम डावलून घराबाहेर पडत आहेत. लाठीच्या प्रसादानेही लोक ऐकत नाही म्हटल्यावर आता काही पोलीस थेट गाण्याच्या माध्यमातून लोकांना घरात राहण्याचं आवाहन केलं. आहे.
बंदोबस्ताला असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने 'सरफरोश' चित्रपटातील 'जिंदगी मौत ना बन जाए' हे गाणं गात लोकांना घराबाहेर पडू असं आवाहन केलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या पोलिसाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. संगीताद्वारे केलेलं आवाहन तरी लोक ऐकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून वारंवार घरी राहण्याबाबत आवाहन केलं जात आहे. मात्र आवाहन, विनंती, विनवणी करुनही नागरिक ऐकत नाही म्हणून घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. असं असूनही बरेच लोक अजूनही रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता चक्क गाण्याच्या माध्यमातून लोकांना घरात राहण्याचं आवाहन केलं आहे.
डॉक्टर आणि पोलिसांवर हल्ले कराल तर खबरदार! लष्कराच्या मदतीची वेळ येऊ देऊ नका, अजित पवारांचा इशारा