कोंबडी झाडावर बसल्याने शेजाऱ्याला बेदम मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 17 Apr 2016 04:50 AM (IST)
NEXT PREV
कल्याण : कोंबडी पाळणं किती महागात पडू शकते हे कल्याणमध्ये घडलेल्या एका घटनेवरुन समोर आलं आहे. शेजाऱ्याची कोंबडी झाडावर बसल्याने झाडाच्या मालकाने शेजाऱ्याला आणि त्याच्या मुलाला बेदम मारहाण केली. या घटनेत बाप-लेक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कल्याणच्या गौरीपाडा परिसरात राहणाऱ्या शांताराम म्हात्रे यांची पाळीव कोंबडी घराजवळ असलेल्या झाडावर चढली होती. मात्र हे झाड आपलं आहे असं सांगत शांताराम म्हात्रे आणि त्यांचा शेजारी विलास म्हात्रेने दावा केला. दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्याचं रुपांत हाणामारीत झालं. विलास म्हात्रे वडिलांना मारहाण होत असल्याचं पाहून शांताराम यांचा मुलगा वाद सोडवण्यासाठी मध्ये पडला. मात्र त्यालाही विलास म्हात्रेने मारहाण केली. या प्रकरणी खटकपाडा पोलिस स्टेशनमध्ये विलास म्हात्रेविरोधात कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.