इंदापूर : इंदापूरच्या निमगाव भाटमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या करुन आरोपीनं करमाळा पोलिसात आत्मसमर्पण केलं आहे. आपल्या पत्नीचे परपुरुषाची अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्या इसमाच्या मुलाचा जीव आरोपीने घेतला.


मूळचा उस्मानाबादच्या परांडातील असलेल्या विश्वास साळुंखेनं इंद्रजित भालेराव या 13 वर्षीय मुलाची हत्या केली. आपल्या पत्नीसोबत इंद्रजितचे वडील पंजाबराव गायकवाड यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय विश्वास साळुंखेला होता. त्याच संशयातून त्यानं पंजाबराव यांचा 13 वर्षीय मुलगा इंद्रजितचं अपहरण केलं.

त्यानंतर एका उसाच्या शेतात नेऊन विश्वासनं इंद्रजितची गळा दाबून हत्या केली. विशेष म्हणजे विश्वासनं थेट करमाळा पोलिस ठाण्यात येऊन पोलिस निरीक्षकांना केलेल्या कृत्याची माहिती दिली. संबंधित घटना टेंभुर्णी हद्दीत झाल्यानं साळुंखेला त्यांच्या स्वाधीन करण्यात आलं.